AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Test retirement : रोहितपाठोपाठ आता विराटचाही मोठी निर्णय, टेस्ट क्रिकेटमधून घेणार संन्यास ! BCCI लाही कळवलं

Virat Kohli Test retirement : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आता त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याने बीसीसीआयलाही या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे विराटच्या या निर्णयानंतर आता तो आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

Virat Kohli Test retirement : रोहितपाठोपाठ आता विराटचाही मोठी निर्णय, टेस्ट क्रिकेटमधून घेणार संन्यास ! BCCI लाही कळवलं
विराट कोहलीचा मोठा निर्णय Image Credit source: social media
| Updated on: May 10, 2025 | 8:25 AM
Share

दोन दिवसांपूर्वीच भारताचा नाामवंत खेळाडू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्याने अनेकांचं मन मोडलं होतं. मात्र त्यापाठोपाठ आता क्रिकेटच्या चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. कारण आता रोहित पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याने बीसीसीआयलाही याबद्दल माहिती दिली आहे. या निर्णयानंतर आता विराट हा आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

मात्र असं असलं तरी बोर्डाच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने कोहलीला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. आता निवड समिती इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करताना कोहलीच्या भविष्याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचं आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट अपयशी

कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान 36 वर्षांचा विराट कोहली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला. तिथे भारताला 5 सामन्यांच्या मालिकेत 1-3 असा पराभव पत्करावा लागला. मालिकेतील पहिल्या सामन्यात म्हणजेच पर्थ कसोटीत विराट कोहलीने शतक झळकावले होते, पण त्यानंतर त्याला धावांसाठी बराच संघर्ष करावा लागला. त्या मालिकेतील 5 सामन्यांच्या9 डावात कोहलीने 23.75 च्या सरासरीने फक्त 190 धावा केल्या होत्या. यामध्ये पर्थमध्ये झळकवलेले 100 धावांचे (एकमेव) नाबाद शतक समाविष्ट होते.

विराटच्या आधी, हिटमॅन रोहित शर्माने बुधवारी (7 मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 7 मे रोजी त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि लाल चेंडूच्या क्रिकेटला निरोप देत असल्याचे जाहीर केलं.मात्र, तो अजूनही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामने खेळत राहणार आहे. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर 38 वर्षीय रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

रोहितप्रमाणेच, कोहलीनेही 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला अलविदा म्हटले. अशा परिस्थितीत, आता क्रिकेटच्या चाहत्यांना ROKO (रोहित आणि कोहली) जोडी फक्त एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसेल. हे दोघेही सध्या आयपीएल क्रिकेटमध्ये खेळत होते. पण भारत-पाकिस्तान तणावामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.

2001 साली केलं पदार्पण

विराट कोहलीने जून 2011 साली किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यानंतर कोहलीने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 15 धावा केल्या. त्याने शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे जानेवारी 2025 मध्ये खेळला. या शेवटच्या कसोटीत, कोहलीने पहिल्या डावात 17 धावा आणि दुसऱ्या डावात 6 धावा केल्या.

विराट कोहलीचं क्रिकेट कर‍िअर

123 टेस्ट, 210 इनिंग्स, 9230 रन, 46.85 ॲव्हरजे, 30 शतक, 31 अर्धशतक 302 वनडे, 290 इनिंग्स, 14181 रन, 57.88 ॲव्हरेज, 51 शतक, 74 अर्धशतक, 5 विकेट 125 टी20, 117 इनिंग्स, 4188 रन, 48.69 ॲव्हरेज, 1 शतक, 38 अर्धशतक, 4 विकेट

भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.