IND vs SA : टीम इंडिया गुवाहाटीत हरल्यानंतरही भारताचा एक मोठा प्लेयर खूप खुश आहे, कारण…
IND vs SA : गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडिअमवर 26 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेने भारताला 408 धावांनी पराभूत केलं. टेस्ट क्रिकेटमध्ये धावांच्या दृष्टीने टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. या पराभवानंतर संपूर्ण टीम आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर भरपूर टीका सुरु आहे.

भारतीय क्रिकेट टीमला मायदेशात आणखी एका निराशाजनक, लाजिरवाण्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे. टीम इंडियाला टेस्ट सीरीजमध्ये 2-0 क्लीनस्वीप सहन करावं लागलं. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते का आहोत? हे सिद्ध केलं. या निकालाने टीम इंडियाचे चाहते आणि माजी खेळडू निराश आहेत. पण माजी कर्णधार सौरव गांगुली या मॅचनंतर आनंदात दिसला. टीम इंडियाचा पराभव हे सौरव गांगुलीच्या आनंदाचं कारण नाही, तर गुवाहाटी स्टेडिअमचा टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू आणि या सामन्यासाठी चांगला पीच तयार करणं हे सौरवच्या आनंदामागचं कारण आहे. गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडिअमवर 26 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेने भारताला 408 धावांनी पराभूत केलं. टेस्ट क्रिकेटमध्ये धावांच्या दृष्टीने टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. या पराभवानंतर संपूर्ण टीम आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर भरपूर टीका सुरु आहे. त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. पण या सगळ्यामध्ये गुवाहाटी स्टेडिअमच्या पीचने सगळ्यांना हैराण केलं.
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि BCCI चा माजी अध्यक्ष सौरव गांगुली बरसापारा स्टेडिअमच्या पीचने प्रभावित झाला. गुवाहाटी टेस्ट मॅच संपल्यानंतर सौरव गांगुलीने सोशल माीडियावर एक पोस्ट केली. “पहिल्या टेस्टसाठी गुवाहाटीला शुभेच्छा. शानदार टेस्ट पीच. स्टेडिअमवरील सुविधांच्या दृष्टीने माझा अनुभव चांगला होता. प्रत्येकासाठी काही ना काही होतं. जॅनसनच्या 5 विकेट, फलंदाजांनी धावा केल्या आणि चौथ्या-पाचव्या दिवशी स्पिनर्सचा प्रभाव” गांगुलीने दक्षिण आफ्रिकेच्या टीमचं कौतुक केलं. टीम इंडियाचा उत्साह देखील त्याने वाढवला. “दक्षिण आफ्रिका खास होती. युवा भारतीय संघ बदलाच्या प्रक्रियेतून जात आहे. ते पुढे जाऊन अधिक सुधारणा करतील” असं सौरव म्हणाला.
पहिला कसोटी सामना अडीच दिवसात संपला होता
गुवाहाटी येथे पहिल्यांदा कसोटी सामना झाला. भारताचं हे 30 वं टेस्ट वेन्यू बनलं. संपूर्ण पाच दिवस हा कसोटी सामना चालला. फॅन्सचं चांगलं एंटरटेनमेंट झालं. याआधी कोलकाच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवरील कसोटी सामना अडीच दिवसात संपला होता. त्यासाठी पीचवर टीका होत होती. योगायोगाने गांगुली सध्या बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे. त्याचा प्रयत्न असेल की, पुढच्या सामन्यांसाठी ईडन गार्डन्सची खेळपट्टी अधिक चांगली व्हावी.
