IND vs SA : गौतम गंभीर हा काही माझा नातेवाईक लागत नाही, अश्विनचा टीकाकारांना एकदम रोकडा सवाल, तुम्ही मला सांगा…
IND vs SA : मागच्यावर्षी याच नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध 3-0 ने कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी 12 वर्षात मायदेशात कसोटी मालिकेत झालेला टीम इंडियाचा हा पहिला पराभव होता. आता वर्षभराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरीज 2-0 ने हरलो आहोत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका 2-0 ने गमावल्यानंतर टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर सर्वांच्या निशाण्यावर आहेत. कोलकाता पाठोपाठ गुवाहाटी कसोटीत टीम इंडियाचा अत्यंत दारुण पराभव झाला. टीम इंडियाचा रेकॉर्ड 408 धावांनी पराभव झाला. टीम इंडियाची मागच्या काही वर्षातील ही अत्यंत लाजिरवाणी कामगिरी आहे. हेड कोच गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला वनडे आणि T20 मध्ये यश मिळतय. पण तेच कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागतोय. गौतम गंभीर हेड कोच असताना वर्षभरात भारताने मायदेशात दुसरी कसोटी मालिका गमावली आहे. त्यामुळे गौतम गंभीर सर्वांच्या रडारवर आहेत. टीम इंडियाचा माजी खेळाडू रविचंद्रन अश्विनने मात्र गौतम गंभीर यांचा बचाव केला आहे. अश्विनने निवृत्ती जाहीर करण्याआधी मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया टूरवर गंभीर कोच असताना तो टीम इंडियाचा भाग होता.
“टीकाकार कोचच्या चुका शोधत आहेत. पण खेळाडू त्याच्यावाटेची पुरेशी जबाबदारी घेत नाहीयत” असं अश्विनच म्हणणं आहे. या पराभवानंतर गौतम गंभीरला हेड कोच पदावरुन हटवण्याची मागणी सुरु झाली आहे. एक्सपर्ट गंभीरची रणनिती आणि सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अश्विन गौतम गंभीरचा बचाव करताना म्हणाला की, “ड्रेसिंग रुममध्ये जे महत्वाचे निर्णय घेतले जातात, त्यात कोचचा सहभाग असतो. पण या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी खेळाडूंवर असते” “कोच बॅट उचलून मैदानात खेळायला जाऊ शकत नाही. तो फक्त खेळाडूंशी बोलण्याचं आपलं काम करु शकतो” असं अश्विन त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला. “मी सोपा प्रश्न विचारतो, कोच काय करु शकतो?. तुम्ही स्वत:ला कोचच्या जागी ठेऊन पहा. निर्णय घेणं कोच आणि कॅप्टनवर आहे. पण खेळण्याचं कौशल्य आणि परफॉर्म करणं ही प्लेयरची जबाबदारी आहे” असं अश्विन म्हणाला.
गौतम हा काही माझा नातेवाईक नाही
“तामिळमध्ये आम्ही म्हणतो पीठ असेल, तर चपाती किंवा रोटी करु शकतो. पण तुमच्याकडे पीठच नसेल, तर चपाती कशी करणार? प्लेयर्सच्या बाजूने मला पुरेसे प्रयत्न दिसलेले नाहीत की तुम्ही फक्त एकट्या निर्णयावर बोट ठेवालं. निर्णयप्रक्रिया चांगली असली पाहिजे. यात दुमत नाही. पण मला व्यक्तिगत कोणा एका व्यक्तीवर टीका करायला आवडत नाही. हा कोणाला पाठीशी घालण्याचा विषय नाही. गौतम हा काही माझा नातेवाईक नाही” असं सुद्धा अश्विन स्पष्टपणे बोलला.
