AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीर याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर थेट या खेळाडूंचे टोचले कान, नाव घेत म्हटले…

भारताने कालच्या सामन्यात धमाकेदार गेम खेळला. यानंतर संघातील खेळाडूंचे काैतुक करताना गाैतम गंभीर दिसला. मात्र, त्यावेळी काही खेळाडूंना टोमणा मारतानाही गाैतम गंभीर दिसला. आता भारत उपात्य फेरीत पोहोचला आहे.

गौतम गंभीर याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर थेट या खेळाडूंचे टोचले कान, नाव घेत म्हटले...
Gautam Gambhir
| Updated on: Mar 02, 2026 | 11:07 AM
Share

कालचा महामुकाबला भारतासाठी करो या मरोचा होता… शेवटी भारताने आपली ताकद दाखवत हा सामना जिंकला. सुपर 8 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने 5 विकेट्स राखून वेस्ट इंडिजचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पराभवाचा थेट वचपा काढला. टी 20 वर्ल्ड कपला भारताने धमाकेदार पद्धतीने सुरूवात केली. मात्र, दक्षिण आफ्रिकेसोबत भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजसोबतचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला जिंकायचा होता. त्याशिवाय भारताला उपांत्य फेरीचे तिकिट मिळणार नव्हते. भारताने ही दोन्ही सामने आपल्या नावावर करून थेट उपांत्य फेरी गाठली आहे. वेस्ट इंडिजने भारताने 196  धावांचे टार्गेट दिले होते. भारतीय क्रिकेटर संजू सॅमसन याने फक्त 50 बॉलमध्ये 97 धावांची जोरदार खेळी खेळत भारताला विजय मिळून दिला. संजूवर काैतुकांचा वर्षाव होत आहे.

या सामन्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने अनेक प्रश्नांवर थेट उत्तरे दिली. काही खेळांडूबद्दल स्पष्ट बोलताना गौतम गंभीर दिसला. सामन्यातील छोट्या योगदानाचेही काैतुक केले जात आहे हे चांगले असल्याचे त्याने म्हटले. यावेळी टोमणा मारत गौतम गंभीरने म्हटले की, बऱ्याच काळापासून फक्त काही लोकांनाच श्रेय मिळत आहे. सुरूवातीला संजू सॅमसनला मैदानाच्या बाहेर ठेवण्यात आले होते.

यावेळी लोक संजू सॅमसनबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत होते. मात्र, यावर बोलताना गंभीर स्पष्टपणे म्हणाला की, हा निर्णय खूप विचारपूर्वक घेण्यात आला होता. मुळात म्हणजे आम्हाला माहिती होते की, संजूमध्ये नक्की किती ताकद आहे. त्याच्या नावावर टी 20 मध्ये तीन शतक आहेत. कधी कधी दबावामुळे खेळाडूला बाहेर ठेवावेही लागते.

यावेळी गौतम गंभीर याला शिवम दुबे आणि तिलक यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना गाैतम गंभीर म्हणाला की, माझ्यासाठी शिवमचे ते दोन चौकार संजूच्या 97 धावांइतकेच नक्की महत्त्वाचे आहेत. मुळात म्हणजे मोठे योगदान चर्चेत असते आणि छोटे छोटे योगदान टीमला जिंकवण्याकरिता मदत करते. आता गौतम गंभीर याच्या याच विधानाची जोरदार चर्चा ही रंगत आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?