AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK : मुंबईसाठी वेगळा नियम का? CSK विरुद्ध MI कडून खेळले 13 प्लेयर, अंपायरच्या निर्णयावरुन मोठा वाद

MI vs CSK : आयपीएलमध्ये टीम्सना प्लेइंग-11 शिवाय फक्त इम्पॅक्ट प्लेयरचा वापर करता येतो. पण कालच्या चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 13 प्लेयर खेळले. यावरुन सोशल मीडियावर मोठा वाद सुरु आहे. अंपायरने 13 प्लेयरना परवानगी कशी दिली? अशी चर्चा सुरु

MI vs CSK : मुंबईसाठी वेगळा नियम का? CSK विरुद्ध MI कडून खेळले 13 प्लेयर, अंपायरच्या निर्णयावरुन मोठा वाद
Mumbai Indians Image Credit source: PTI
| Updated on: Apr 24, 2026 | 9:51 AM
Share

IPL Concussion Substitute Rules : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. आयपीएलमधील ही 33 वी मॅच होती. या सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा तब्बल 103 धावांनी पराभव केला. वानखेडेवर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईच्या टीमने पराभवाची हॅटट्रिक केली. या मॅचमध्ये एक वेगळी हैराण करणारी घटना पहायला मिळाली. मुंबई इंडियन्सकडून एकूण 13 खेळाडू या सामन्यात खेळले. तुम्ही म्हणालं क्रिकेटच्या कुठल्याही सामन्यात 11 खेळाडू असतात. पण 13 खेळाडू कसे खेळले?. यामागे एक कारण आहे. पण अंपायरने 13 व्या खेळाडूला परवानगी दिल्याने मोठा वादही सुरु आहे. आयपीएलमध्ये टीम्सना प्लेइंग-11 शिवाय फक्त इम्पॅक्ट प्लेयरचा वापर करता येतो.

म्हणजे दोन्ही टीम्सकडून एकामॅचमध्ये प्रत्येकी 12 खेळाडू खेळू शकतात. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने कन्कशन सब्स्टीट्यूट नियमाचा आधार घेतला. त्यामुळे मुंबईकडून 13 खेळाडू या सामन्यात खेळले. सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा स्पिनर मिचेल सँटनरला दुखापत झाली होती. पहिल्या इनिंगमध्ये मुंबईची गोलंदाजी होती. 17 व्या ओव्हरमध्ये कार्तिक शर्माची कॅच घेताना सँटनरच्या खांद्याला दुखापत झाली. सँटनर खांदा पकडून मैदानाबाहेर जाताना दिसला. त्याने तो पर्यंत आपल्या चार ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला होता. 44 रन्स देऊन एक विकेट काढलेला. नियमानुसार मुंबईच्या टीमने कन्कशन सब्स्टीट्यूट म्हणून शार्दुल ठाकूरचा टीममध्ये समावेश केला.

अंपायरच्या या निर्णयावरुन सोशल मीडियावर वादळ

जेव्हा कुठल्या खेळाडूच्या डोक्याला किंवा मानेला मार लागतो, तेव्हा कन्कशन सब्स्टीट्यूटचा नियम लागू होतो. अंपायरच्या या निर्णयावरुन सोशल मीडियावर वादळ आलं आहे. काही फॅन्सनी या निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. सुरुवातीला खांद्याला दुखापत झाल्याचा संशय होता. पण रिप्लेमध्ये डोकं धडकल्याचं दिसलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला नव्या खेळाडूला मैदानात उतरवण्याची परवानगी मिळाली.

मुंबईच्या या निर्णयाने सगळेच हैराण

मुंबई इंडियन्सने आधीच इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केला होता. त्यांनी अल्लाह गजनफरच्या जागी दानिश मालेवारला उतरवलं. इम्पैक्ट प्लेयर + एक कॉन्कशन सब यामुळे मुंबईकडून या सामन्यात 13 खेळाडू खेळले. आयपीएलमध्ये अशी घटना फार कमीवेळा पहायला मिळते. मुंबईच्या या निर्णयाने सगळेच जण हैराण झाले आहेत.

Follow Us
महिला कुस्तीपटू प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; 6 गंभीर...
6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले भाजप नेते बृजभूषण शरण सिंहंची निर्दोष मुक्तता
भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा...
मोठी घडामोड! भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची पंकजा मुंडे यांना थेट ऑफर
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला...
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला 15 हजारांहून अधिक पर्यटक देतात भेट, पहा...
मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
Pune News | तर एकही वाचला नसता... मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण?
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण? बड्या नेत्याची पोस्ट चर्चेत
2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी
Shivsena | 2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी खास रणनीती काय?
हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल
हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल, थेट संसदेत...
जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना...
जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना... संजय राऊतांचा मोदींवर थेट प्रहार
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! नेमका मसला काय?
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! रस्त्यांवरील खड्ड्यांपासून पालकमंत्रीपदापर्यंत...नेमका मसला काय?
मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
Mumbai Water Cut Update | मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर