AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar-Sania Chandok : सचिन तेंडुलकरचा मुलगा की सूनबाई? कुणाचं शिक्षण सर्वाधिक? वाचून आश्चर्य वाटेल

जगातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या मुलाचा, क्रिकेटर अर्जुनचा नुकताच साखरपुडा झाला. रिपोर्ट्सनुसार, उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकशी त्यांची एगेंजमेट झाली आहे. अर्जुन की सानिया, दोघांपैकी कोणाचं शिक्षण जास्त आहे ? चला जाणून घेऊया.

Arjun Tendulkar-Sania Chandok : सचिन तेंडुलकरचा मुलगा की सूनबाई? कुणाचं शिक्षण सर्वाधिक? वाचून आश्चर्य वाटेल
अर्जुन तेंडुलकर की सानिया, कुणाचं शिक्षण सर्वाधिक? Image Credit source: social media
| Updated on: Aug 14, 2025 | 1:55 PM
Share

गॉड ऑफ क्रिकेट अर्थात क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरच लाखो नव्हे कोट्यावधी चाहते आहेत आणि आज ते सर्वच सचिनसाठी आनंदी असतील. कारण सचिनचा लाडका लेक, अर्जुन तेंडुलकर आता लवकरच नवरदेव बनणार आहे. हो, हे खरं आहे. सचिनचा मुलगा अर्जुन याचा नुकताच सानिया चंडोकशी साखरपुडा झाला. दोन्ही कुटुंबियांच्या आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत अर्जुन-सानियाची एंगेजमेंट झाली. अर्जुनचं जिच्याशी लग्न ठरलं आहे, ती कोणत्याही सामान्य कुटुंबातील नव्हे तर मुंबईतील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील मुलगी आहे. अर्जुनची होणारी वधू सानिया चांडोक ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (लो कॅलरी आईस्क्रीम ब्रँड) ची मालकी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका खाजगी समारंभात झाला, ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील अगदी जवळचे लोक आणि निवडक लोक उपस्थित होते.

अर्जुनच तेंडुलकरचं शिक्षण

अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला आहे. क्रिकेट त्याच्या रक्तातच आहे, कारण त्याला त्याचे वडील, सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज फलंदाजाकडून प्रेरणा मिळाली आहे.

शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, अर्जुनने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून त्याचे शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने मुंबई विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. त्याने खूप लहान वयातच खेळ खेळायला सुरुवात केली. त्याने 22 जानेवारी 2010 रोजी पुण्यात झालेल्या अंडर-13 स्पर्धेत पदार्पण केले.

सानियाचं शिक्षण कुठून ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया चांडोकने अभ्यासासोबतच व्यवसायातही प्रसिद्धी मिळवली आहे. तिने लंडनमधील टॉप लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून तिचे शिक्षण पूर्ण केले, जे जगातील टॉप शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. सानियाने स्वतःला अभ्यासापुरते मर्यादित ठेवले नाही तर तिने मुंबईत Mr Paws नावाचे एक प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअर देखील स्थापन केले. तिचा ब्रँड पाळीव प्राण्यांची काळजी आणि लक्झरी सेवांसाठी ओळखला जातो.

कुटुंबाकडून अधिकृत घोषणा नाही

अर्जुन-सानियाचा साखरपुडा झाला असला तरी दोन्ही कुटुंबाकडून अद्यापही या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही किंवा कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अर्जुन तेंडुलकर-सानियाच्या साखरपुड्याचे वृत्त येताच सोशल मीडियावर खळबळ माजली. चाहत्यांनीही सचिनचा लेक आणि होणाऱ्या सूनबाईंना शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे.

उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.