Ajinkya Rahane | चौथ्या कसोटीत कुलदीपऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी का दिली, कॅप्टन रहाणे म्हणतो….

वॉशिंग्टन सुंदरने (washington sunder) पदार्पणातील सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली.

Ajinkya Rahane | चौथ्या कसोटीत कुलदीपऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी का दिली, कॅप्टन रहाणे म्हणतो....
कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 4:21 PM

मुंबई : ” कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India Tour Australia 2020) फिरकीपटू म्हणून निवड करण्यात आली होती. कुलदीप संघात स्थान बनवण्यासाठी प्रबळ दावेदार होता. पण आम्हाला बेस्ट प्लेइंग इलेव्हन निवडायची होती. आम्ही चौथ्या सामन्यात पाच गोलंदाजांसह खेळण्याबाबत विचार करत होतो. वॉशिंग्टन सुंदर (washington sunder) बोलिंगसह बॅटिंगही करतो. बॅटिंग त्याचा प्लस पॉइंट आहे. यामुळे सुंदरला संघात संधी देण्यात आली. चौथ्या कसोटीसाठी कुलदीपला घ्यायचा की सुंदरला हे ठरवणं फार अवघड होतं”, असं स्पष्टीकरण ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेतील टीम इंडियाचं नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane)दिलं. (aus vs ind 4th test captain ajinkya rahane Revealed why select washington sunder over kuldeep yadav)

चौथ्या सामन्याआधी टीम इंडियाचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे चौथ्या सामन्यात अश्विनच्या जागी संघात कुलदीपला संधी मिळणं अपेक्षित होतं. कुलदीपला या मालिकेतील शेवटच्या सामन्यात तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये चान्स मिळेल, असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. कुलदीपला वगळून सुंदरला संधी देण्यात आली. यामुळे कुलदीपच्या चाहत्यांमध्ये एकच नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं.

मालिकेनंतर रहाणे कुलदीपला काय म्हणाला?

कुलदीपला संपूर्ण कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. मालिका विजयानंतर कर्णधार रहाणेने ड्रेसिंगरुममध्ये सहकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळेस रहाणे कुलदीपला उद्देशून म्हणाला, ” संपूर्ण मालिकेत तुला संधी मिळाली नाही, हे तुझ्यासाठी फार त्रासदायक ठरलं असेल. तुला संधी मिळाली नाही. यानंतरही तु पॉझिटिव्ह होतास. तुला नक्कीच प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, तु फक्त मेहनत करत रहा.

वॉशिंग्टनची ‘सुंदर’ कामगिरी

सुंदरने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. या पदार्पणातील सामन्यात त्याने टीम इंडियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. सुंदरने पहिल्या आणि दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना अनुक्रमे 3 आणि 1 अशा एकूण 4 विकेट्स घेतल्या. तसेच पहिल्या डावात टीम इंडिया अडचणीत असताना सुंदर आणि शार्दुल ठाकूरने सातव्या विकेटसाठी निर्णायक 123 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात महत्वपूर्ण 22 धावा केल्या. सुदंरने अष्टपैलू कामगिरी करत कर्णधार रहाणेचा निर्णय बरोबर ठरवला.

तसेच सुंदरची इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठीही निवड करण्यात आली आहे. या कसोटी मालिकेची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून होणार आहे. इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंड या दौऱ्यात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहेत.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 4th Test | नटराजन आणि वॉशिंग्टनचा कारनामा, पदार्पणात अफलातून कामगिरी

Ajinkya Rahane | विराट आणि अजिंक्यमध्ये कॅप्टन्सीसाठी टक्कर? काय म्हणतो अजिंक्य !

(aus vs ind 4th test captain ajinkya rahane Revealed why select washington sunder over kuldeep yadav)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.