Ajinkya Rahane | विराट आणि अजिंक्यमध्ये कॅप्टन्सीसाठी टक्कर? काय म्हणतो अजिंक्य !

रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Ajinkya Rahane | विराट आणि अजिंक्यमध्ये कॅप्टन्सीसाठी टक्कर? काय म्हणतो अजिंक्य !
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 8:21 PM

मुंबई : “कसोटीमधील नेतृत्वासाठी माझ्यात आणि विराट कोहलीमध्ये (Virat Kohli) कोणतीच स्पर्धा नाही. विराटचा नेहमीच टीम इंडियाला (Team India) विजय मिळवून देण्याचा उद्देश असतो. जेव्हा माझ्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा विराट कर्णधार म्हणून कामगिरी करतो, तशीच कामगिरी आपण करावी, असाच माझाही उद्देश होता. कर्णधार कोणीही असो, भारताला विजयी करावं हीच आमच्या दोघांची इच्छा असते”, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) दिली.तो एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता.यावेळेस त्याने याबाबत प्रतिक्रिया दिली. (Clash for captaincy between Virat and Ajinkya What does rahane say)

रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तेव्हापासून विराटला वगळून रहाणेला कर्णधार करा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. अजिंक्यने या मुलाखती दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

“पंतला खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं”

“तु कसलाही विचार करु नकोस. तणावमुक्त होऊन इतर वेळेस जसा मुक्तपणे खेळतोस तसाच खेळ, असा सल्ला मी रिषभ पंतला (Rishabh Pant) दिला होता” , असं रहाणे म्हणाला. पंतने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या सामन्यातील दुसऱ्या डावात निर्णायक कामगिरी केली. त्याने नाबाद 89 धावांची खेळी केली. या जोरावर टीम इंडियाने सामन्यासह मालिका जिंकली. पंतच्या या खेळीचं कौतुक करण्यात आलं.

“पुजारा हिंमतवान”

रहाणेने टीम इंडियाचा संकटमोचक चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्या  झुंजार अर्धशतकी खेळीचं कौतुक केलं. “पुजाराने सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीमध्ये निर्णायक भूमिका बजावली. त्याने अनेक चेंडूंचा सामना केला. पुजाराने मैदानात घट्ट पाय रोवून टीम इंडियाची एक बाजू लावून धरली. यामुळे शुबमन गिल (Subhaman Gill) आणि रिषभ पंतला झाला”, असं रहाणेने स्पष्ट केलं. म्हणाला.

संबंधित बातम्या :

Special Story | कसोटी कर्णधार म्हणून योग्य कोण, अजिंक्य की विराट? पाहा दोघांची आकडेवारी

ब्रिस्बेनपासून चंदनापुरीपर्यंत रहाणेंचाच गुलाल, कसोटी मालिका जिंकली, ग्रामपंचायत निवडणुकीतही रहाणे पॅनेल विजयी!

(Clash for captaincy between Virat and Ajinkya What does rahane say)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.