Border Gavaskar Trophy | टीम इंडियाची हॅटट्रिक, सलग तिसरा बॉर्डर गावसकर मालिका विजय

अजिंक्यने आपल्या नेतृत्वात अनुभवी खेळाडंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला बॉर्डर गावसकर मालिकेत विजय मिळवून दिला.

Border Gavaskar Trophy | टीम इंडियाची हॅटट्रिक, सलग तिसरा बॉर्डर गावसकर मालिका विजय
टीम इंडियाचा कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 ने विजय
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 5:23 PM

ब्रिस्बेन : टीम इंडियाने रोमांचक झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात (Aus vs Ind 4th Test) ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2-1 ने बॉर्डर गावसकर मालिकाही जिकंली. या विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रम केले. विशेष म्हणजे टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील (Border Gavaskar Trophy) हॅटट्रिक विजय ठरला. म्हणजेच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा बॉर्डर गावसकर मालिकेत सलग तिसऱ्यांदा पराभव केला आहे. (aus vs ind 4th test Team India won third consecutive Border Gavaskar series)

टीम इंडियाने 2020-21 या दौऱ्यातील कसोटी सामन्यात एकूण 4 कसोटी सामने खेळले. टीम इंडियाची कसोटी मालिकेची सुरुवात पराभवाने झाली. टीम इंडियाला पहिला सामन्यात लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात जोरदार पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या कसोटीत 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केली. यामुळे तिसरा सामना अनिर्णित राहिला. यामुळे चौथा सामना हा अटीतटीचा होता. या चौथ्या सामन्यातील चौथ्या दिवसापर्यंत सामना बरोबरीत होता. मात्र टीम इंडियाच्या फंलदाजांनी शानदार कामिगिरी केली. पण सामना अनिर्णित होतो की काय, असं एका क्षणाला वाटत होतं.

पण रिषभ पंतने निर्णायक क्षणी चांगली कामगिरी केली. पंतच्या खेळीमुळे अनिर्णित वाटणारा सामना हा भारताच्या बाजूने झुकला. यासह टीम इंडियाने रोमांचक झालेल्या सामन्यात कांगारुंवर 3 विकेट्सने विजय मिळवला. यासह मालिकाही जिंकली.

ऑस्ट्रेलियातील पहिला मालिका विजय

त्याआधी टीम इंडियाने मागील कसोटी मालिकेत 2018/19 ऑस्ट्रेलियाचा 2-1ने पराभव केला होता. ही मालिका एकूण 4 सामन्यांची होती. या मालिकेतील एकूण 2 सामने टीम इंडियाने जिंकले. 1 कांगारुंनी जिंकला. तर 1 सामना अनिर्णित राहिला. विशेष म्हणजे टीम इंडियाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2016/17

ऑस्ट्रेलियाचा संघ 2016/17 मध्ये भारत दौऱ्यात आला होता. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत टीम इंडियाने 2 सामने जिंकले. तर एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. तर 1 सामना अनिर्णित राहिला. अशा प्रकारे टीम इंडियाने या कसोटी मालिकेतही विजय मिळवला.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीबद्दल थोडक्यात….

ऑस्ट्रेलियाचे अॅलेन बॉर्डर आणि टीम इंडियाचे लिटील मास्टर सुनील गावसकर. बॉर्डर आणि गावसकर हे ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचे माजी दिग्गज खेळाडू आहेत. या दोघांनी कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात खेळण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेला या दोघांचं नाव देण्यात आलं आहे.

या कसोटी मालिकेचं आयोजन आलटून पालटून ऑस्ट्रेलिया आणि भारतात करण्यात येतं. या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील ही आतापर्यंतची 15 वी मालिका आहे. या ट्रॉफीचं 1996-97 मध्ये पहिल्यांदा भारतात आयोजन करण्यात आलं होतं. ही एकूण 1 सामन्यांची मालिका होती. हा एकमेव सामना जिंकून टीम इंडियाने ही मालिका जिंकली होती.

आतापर्यंत एकूण 15 कसोटी मालिका खेळण्यात आल्या आहेत. यामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 14 पैकी एकूण 9 वेळा बॉर्डर गावसकर मालिकेवर आपलं नाव कोरलं आहे. तर ऑस्ट्रेलियानेही 5 वेळा मालिका जिंकली आहे. तर फक्त एकदाच ही मालिका बरोबरीत राहिली होती. 2003-04 मध्ये या मालिकेचं आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आलं होतं. ही एकूण 4 सामन्यांची मालिका होती. या मालिकेतील प्रत्येकी 1 सामना दोन्ही संघांनी जिंकला होता. तर इतर 2 सामने हे अनिर्णित राहिले होते.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Ajinkya Rahane | ना कोहली, ना बुमराह, नवख्या खेळाडूंना घेऊन अजिंक्य रहाणे कसा जिंकला?

Aus vs Ind 4th Test | व्हिलन होता होता रिषभ पंत हिरो ठरला, निर्णायक क्षणी गियर बदलला!

(aus vs ind 4th test Team India won third consecutive Border Gavaskar series)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.