Rahul Dravid | बीसीसीआय टीम इंडियाच्या मदतीसाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियात पाठवणार?

अडचणीत असलेल्या टीम इंडियाच्या मदतीसाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवायला हवं, असा सल्ला दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयला दिला होता.

Rahul Dravid | बीसीसीआय टीम इंडियाच्या मदतीसाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियात पाठवणार?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 4:06 PM

मुंबई : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात  (Australia vs India 1st Test)  8 विकेट्सने पराभूत केलं. यासह ऑस्ट्रेलियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद शमीला दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकावे लागलं आहे. तर विराट या सामन्यानंतर भारतात परतणार आहे. आधीच लाजीरवाणा पराभव त्यात मुख्य गोलंदाज दुखापतग्रस्त. यामुळे टीम इंडिया अडचणीत आहे. अडचणीत असलेल्या भारतीय संघाच्या मदतीला एनसीए प्रमुख राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवावं, असा सल्ला दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar)  यांनी बीसीसीआयला (BCCI)दिला होता. यावर बीसीसीआयने उत्तर दिलं आहे. australia vs india bcci to send Rahul Dravid to Australia to help India

कोणीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही

नवनिर्वाचित बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “कोणालाही ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची आवश्यकता नाही. कोणीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा डाव गडगडला. हे असं कधीकधी होतं. यातून सावरण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात आले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू नक्कीच दमदार कमबॅक करतील. तसेच ते चांगली कामगिरीही करतील”, असा आशावाद राजीव शुक्ला यांनी व्यक्त केला.

“विराटची उणीव भासेल”

“विराट पहिल्या कसोटीनंतर भारतात परतणार आहे. यामुळे विराट टीम इंडियासाठी उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी उपस्थित नसेल. यामुळे टीम इंडियाला विराटची उणीव भासेल. पण आपल्याला टीम इंडियाच्या मागे ठामपणे उभं रहावं लागेल. टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया दौरा नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. याआधीच्या दौऱ्यात तर कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करणं चॅलेंजिंग असायचं. मात्र आताचे भारतीय खेळाडू कांगारुंच्या गोलंदाजीचा धिटाने सामना करतात. सोबत धावाही करतात” असं म्हणत शुक्ला यांनी टीम इंडियावर विश्वास दाखवला.

दिलीप वेंगसरकर काय म्हणाले होते?

भारतीय संघ अडचणीत आहे. भारताच्या मदतीसाठी बीसीसीआयने द्रविडला तातडीने ऑस्ट्रेलियाला पाठवायला हवं. ऑस्ट्रेलियात चेंडू हवेत स्विंग होतो. या स्विंग चेंडूचा सामना कसा करावा, याबाबत द्रविडव्यतिरिक्त दुसरा कोणीही योग्य मार्गदर्शन करु शकत नाही”, असं वेंगसरकर म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

Australia vs India 2nd Test | “टीम इंडिया अडचणीत, मदतीसाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा”

Australia vs India | पृथ्वी शॉ की केएल राहुल? पाहा आकडेवारी कोणाच्या बाजूने?

australia vs india bcci to send Rahul Dravid to Australia to help India

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.