Australia vs India | पृथ्वी शॉ की केएल राहुल? पाहा आकडेवारी कोणाच्या बाजूने?

टीम इंडियाने पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. यामुळे दुसऱ्या सामन्यत टीम इंडियामध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. यामुळे संघात सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉऐवजी केएलला संधी मिळण्यातची शक्यता आहे.

Australia vs India | पृथ्वी शॉ की केएल राहुल? पाहा आकडेवारी कोणाच्या बाजूने?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 2:46 PM

मुंबई : टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे टीम इंडियावर चौफेर टीका करण्यात आली. टीम इंडियाकडून पहिल्या सामन्यात अनेक चुका झाल्या. संघ निवड, ढिसाळ क्षेत्ररक्षण, फलंदाजांची हारकिरी अशा चुकांमुळे टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. तसेच या सामन्यात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वीऐवजी केएल राहुलला (K L Rahul) सलामीवीर म्हणून संधी देण्यात यावी, असं टीम इंडियाचे माजी खेळाडू लिटील मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले आहेत. Australia vs India Prithvi Shaw and KL Rahul performance in the first 5 Tests

गावसकर काय म्हणाले?

“टीम इंडियामध्ये दुसऱ्या सामन्यात काही बदल करण्यात यावेत, याबाबत गावसकर यांनी आपलं मत मांडलं. “टीम इंडियामध्ये दुसऱ्या सामन्यासाठी 2 बदल केले जाऊ शकतात. यामध्ये ओपनर म्हणून पृथ्वी शॉऐवजी लोकेश राहुलला संधी देण्यात येऊ शकते. तर युवा शुभमन गिलला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायला हवं. गिल सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. आपण चांगली सुरुवात केली तर नक्कीच परिस्थिती बदलेल”, असा आशावाद गावसकर यांनी व्यक्त केला.

पृथ्वी पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. पृथ्वीला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. तर दुसऱ्या डावात त्याने अवघ्या 4 धावा केल्या. त्यामुळे पृथ्वीला आता पुन्हा संधी देण्यात येउ नये, अशी मागणी केली जात आहे. पृथ्वीने आतापर्यंत केवळ 5 कसोटी सामने खेळले आहेत. तर केएलला एकूण 36 सामन्यांचा अनुभव आहे. यामुळे अनुभवाबाबत केएल पृथ्वीवर वरचढ आहे. मात्र या दोघांची पहिल्या 5 कसोटीत कशी कामगिरी होती, हे आपण पाहणार आहोत.

केएलची पहिल्या 5 कसोटीतील कामगिरी

केएलने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी पदार्पण केलं. केएलने पहिल्या 5 सामन्यातील 10 डावांमध्ये एकूण 256 धावा केल्या. यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे. केएलने या 5 पैकी पहिले 2 सामने ऑस्ट्रेलिया तर उर्वरित 3 सामने हे श्रीलंकेसोबत खेळले आहेत.

पृथ्वीची कसोटी कारकिर्द

पृथ्वीने कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 9 डावात 339 धावा केल्या आहे. यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. यामुळे धावांच्या बाबतीत पृथ्वी वरचढ आहे. तर शतकांच्या बाबतीत केएल वरचढ आहे.

दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना हा 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. हा बॉक्सिंग डे क्रसोटी सामना असणार आहे.

संबंधित बातम्या :

Australia vs India | पहिल्या सामन्यात सर्वच भारतीय खेळाडू अपयशी, मग टीका फक्त मुंबईकर पृथ्वीवर का?

Australia vs India Prithvi Shaw and KL Rahul performance in the first 5 Tests

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.