Australia vs India | पहिल्या सामन्यात सर्वच भारतीय खेळाडू अपयशी, मग टीका फक्त मुंबईकर पृथ्वीवर का?

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया अपयशी ठरली. दुसऱ्या डावात सर्वच भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. मात्र टीका फक्त मुंबईकर पृथ्वी शॉवर करण्यात येत आहे.

Australia vs India | पहिल्या सामन्यात सर्वच भारतीय खेळाडू अपयशी, मग टीका फक्त मुंबईकर पृथ्वीवर का?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 12:09 PM

अ‌ॅडिलेड : पहिल्या कसोटी सामन्यात (Australia vs India) ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजाला दुसऱ्या डावात दुहेरी आकडा गाठता आला नाही. ज्याला टेस्ट स्पेशालिस्ट म्हटलं जातं तो चेतेश्वर पुजाराही शून्यावर बाद झाला. जिथे टीम इंडियाचे अनुभवी फंलदाज अपयशी ठरले, तिथे नवशिक्या पृथ्वी शॉकडून (Prithvi Shaw) काय अपेक्षा ठेवणार. पहिल्या सामन्यात संपूर्ण संघ अपयशी ठरला. मात्र तरीही पृथ्वी शॉवर टीका करण्यात येत आहे. पृथ्वीने या सामन्यात पहिल्या डावात 0 तर दुसऱ्या डावात 4 धावा केल्या. Australia vs india first test match Team India all the batsmen failed but Prithvi Shower was criticized

पृथ्वीला आयपीएलच्या 13 व्या मोसमातही फार चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यात पहिल्या कसोटीतही पृथ्वी अपयशी ठरला. यामुळे पृथ्वीवर काही क्रिकेटपटूंनी टीका केली. नेटीझन्सनी तर पृथ्वीला इतकं ट्रोल केलं की तो ट्विटरवर ट्रेंड झाला. पण पृथ्वी खरचं इतका वाईट खेळला का? हे आपण इतर क्रिकेटपटूंसोबतच्या आकडेवारीशी तुलना करुन जाणून घेऊयात.

टीम इंडियातील चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली हे खेळाडू अनुभवी आहेत. यांना कसोटीमध्ये फारसा अनुभव आहे. मात्र या आणि इतर खेळाडूंची कसोटीतील सुरुवात फारशी चांगली किंवा उल्लेखनीय नव्हती. हे खेळाडूंचीही सुरुवात अडखळत झाली होती. यानिमित्ताने आपण टीम इंडियाच्या आणि काही दिग्गज फलंदाजांची पहिल्या सामन्यातील आकडेवारी पाहुयात.

पहिल्या कसोटीतील डावनिहाय धावा

.सचिन तेंडुलकर- 15.

. विराट कोहली- 74 आणि 4

.चेतेश्वर पुजारा- 43 आणि 0

.अजिंक्य रहाणे- 42 आणि 0

परदेशी खेळाडूंची पहिल्या कसोटीतील धावा

ब्रायन लारा- 44

रिकी पॉन्टिंग-96

जॅक कॅलीस- 1

वर ज्या खेळाडूंची आकडेवारी देण्यात आली आहे, ते क्रिकेटमधील दिग्गज तसेच अनुभवी खेळाडू आहेत. मात्र यांचीही सुरुवात फारशी चांगली राहिली नाहीये. मात्र या सर्वांच्या तुलनेत पृथ्वी हा उजवा ठरला आहे. पृथ्वीने आपल्या कसोटी पदार्पणातच शतक झळकावलं आहे. तसेच त्याने आतापर्यंत केवळ 5 कसोटी सामनेच खेळले आहेत. पृथ्वी युवा खेळाडू आहे. त्याला फार अनुभव नाही. तो आपल्या चुकांमधून शिकेल. त्याला आणखी वेळ द्यायला हवा, अशी प्रतिक्रियाही क्रिकेट चाहत्यांकडून देण्यात येत आहे.

पृथ्वीने आतापर्यंत एकूण 5 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 9 डावात 339 धावा केल्या आहेत. यात एका शतकी खेळीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पृथ्वीने आपल्या पदार्पणातील सामन्यात शतक झळकावलं.

पृथ्वीबाबत आकाश चोप्राची प्रतिक्रिया

“पहिल्या कसोटीत केवळ पृथ्वीच नाही तर टीम इंडियाचे खेळाडू धावा करण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली”, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने दिली. तसेच दुसऱ्या सामन्यात पृथ्वीला संधी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली जात आहे. याबाबतही आकाश चोप्राने आपलं मत व्यक्त केलं आहे. ” पृथ्वीला दुसऱ्या सामन्यातून बाहेर ठेवल्यास तो एकटा बळीचा बकरा ठरेल”, अशी प्रतिक्रिया चोप्राने दिली.

भारतीय खेळाडू अयशस्वी का ठरले?

पहिला कसोटी सामना पिंक (गुलाबी) चेंडूने खेळण्यात आला. ऑस्ट्रेलियात गुलाबी चेंडूने खेळण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ होती. या चेंडूने कशाप्रकारे खेळायचं, याबाबत टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूला अनुभव नव्हता. हा गुलाबी चेंडू हवेत कसा स्विंग होतो, उसळी घेतो का, तसेच खेळपट्टीकडून काही मदत मिळते का, या आणि अशा कोणत्याच प्रकारची माहिती किंवा अनुभव टीम इंडियाच्या खेळाडूंना नव्हता. त्यामुळे दुसऱ्या डावात आघाडी असून सुद्धा टीम इंडियाचा दुसरा डाव कोसळला.

संबंधित बातम्या :

Prithvi Shaw | मुंबईकर पृथ्वी शॉला कशाची दृष्ट लागली ?

Australia vs india first test match Team India all the batsmen failed but Prithvi Shower was criticized

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.