Team India : माझा आणि क्रिकेटचा प्रवास इथपर्यंतच…भारताचा एक मोठा खेळाडू अचानक रिटायर का?
Team India : मागच्या महिन्याभरात विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या दोन्ही सीनियर खेळाडूंनी मागच्यावर्षी T 20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. आता भारताच्या आणखी एका मोठ्या खेळाडूने तडकाफडकी निवृत्ती घेतल्याची चर्चा पसरली आहे.

एकाबाजूला RCB पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्याच सेलिब्रेशन करत आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन अक्षर पटेलने सन्यास घेतल्याची बातमी सुरु आहे. अक्षर पटेलच म्हणणं आहे की, त्याने क्रिकेटचा निरोप घेण्याचा निर्णय घेतलाय. आयपीएल 2025 च्या समाप्तीनंतपर एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षर पटेल बोलताना दिसतोय की, त्याचा आणि क्रिकेटचा प्रवास इथपर्यंतच होता.
या व्हिडिओमध्ये अक्षर पटेल रिटायरमेंट स्पीच देताना दिसतोय. “खूप महत्त्वाची घोषणा आहे. माझ्यासाठी हे जाहीर करणं सोप नाहीय. क्रिकेटने मला सर्व काही दिलं. माझी ओळख, तुमचं प्रेम, पण प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो. कदाचित माझा आणि क्रिकेटचा प्रवास इथपर्यंतच होता” असं अक्षर या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय.
दिल्लीचा प्रवास पाचव्या स्थानावर संपला
अक्षर पटेल भारताच्या सर्वोत्तम ऑलराऊंडरपैकी एक आहे. या व्हिडिओचा तपास केला, तेव्हा लक्षात आलं की, अक्षर पटेलने निवृत्ती घेतलेली नाही. हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ AI च्या माध्यमातून बनवण्यात आला आहे. अक्षर पटेलने आपल्या निवृत्तीवर कुठलही स्टेटमेंट केलेलं नाही किंवा पोस्टही केलेली नाही. BCCI ने देखील दुजोरा दिलेला नाही. आयपीएल 2025 मध्ये अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. दिल्लीला पॉइंटस टेबलमध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. अक्षर पटेल भारताच्या T20 टीमचा उपकर्णधार आहे.
View this post on Instagram
अक्षर टीममधील सीनियर खेळाडंपैकी एक
मागच्या महिन्याभरात विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या दोन्ही सीनियर खेळाडूंनी मागच्यावर्षी T 20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. विराट-रोहितने T20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर अक्षर पटेल T20 टीममधील सर्वात सीनियर खेळाडूंपैकी एक आहे.
