Sourav Ganguly | यशस्वी अँजिओप्लास्टी, ‘दादा’ ठणठणीत, गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज

छातीत दुखत असल्यामुळे गांगुलीला (Sourav Ganguly) बुधवारी (27 जानेवारी) अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Sourav Ganguly | यशस्वी अँजिओप्लास्टी, 'दादा' ठणठणीत, गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज
Sourav Ganguly
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 12:34 PM

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला (Bcci Chief Sourav Ganguly) अँजिओप्लास्टीनंतर कोलकातामधील अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात (Sourav Ganguly discharged from Apollo Hospital) आला आहे. एएनआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर गांगुलीला डॉक्टरांनी किमान 7 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. “गांगुलीची प्रकृती आता ठणठणीत आहे”, अशी माहिती डॉक्टर राणा दासगुप्ता यांनी दिली. (BCCI Chief Sourav Ganguly discharged from Apollo Hospital in Kolkata following angioplasty)

गांगुलीवर काही दिवसांपूर्वी यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान गांगुलीच्या हृदयाजवळ दोन स्टेंट बसवण्यात आले. प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. देवी शेट्टी आणि डॉ. अश्विन मेहता यांच्या टीमने गुरुवारी रात्री सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी केली. गांगुलीच्या छातीत दुखत असल्यामुळे बुधवारी (27 जानेवारी) त्याला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी डॉ. सप्तर्षी बसू आणि डॉ. सरोज मोंडल यांनी गांगुलीवर उपचार केले.

आधी हृदयविकाराचा सौम्य झटका

दरम्यान गांगुलीला जानेवारी महिन्यात ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. गांगुली राहत्या घरी वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याला छातीत दुखु लागले होते. यानंतर त्याला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर गांगुलीला त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल केले गेले होते. गांगुलीवर उपचार करण्यासाठी एकूण 4 डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ब्लॉकेज काढण्यात आले.

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकिर्द

सौरव गांगुलीने 113 कसोटी, 311 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गांगुलीने एकूण 311 सामन्यात 22 शतकांसह 73.71 च्या स्ट्राईक रेटने एकूण 11 हजार 363 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने 100 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच 113 कसोटींमध्ये त्याने 16 शतकांसह 7 हजार 212 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कार्यभार त्याच्याच देखरेखीखाली सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Sourav Ganguly Health News Updates :सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकले जाणार

Sourav Ganguly Health Update | सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

सौरव गांगुलीवर तातडीची शस्त्रक्रिया, रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकणार

(BCCI Chief Sourav Ganguly discharged from Apollo Hospital in Kolkata following angioplasty)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.