AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ खेळाडूला 2 वर्षापासून BCCI ने पैसेच दिले नाहीत, कोरोनावरील उपाचारासाठीही त्याच्याकडे पैसे नाहीत!

बिहारचा 21 वर्षीय क्रिकेटपटू प्रशांत सिंहला गेल्या 2 वर्षांपासून बीसीसीयने सामन्याची फी दिलेली नाहीय. प्रशांत सिंह बिहारच्या अंडर 23 संघाचा सदस्य आहे. (BCCI did not Pay Prashant Singh Match Fees Last 2 Year)

'या' खेळाडूला 2 वर्षापासून BCCI ने पैसेच दिले नाहीत, कोरोनावरील उपाचारासाठीही त्याच्याकडे पैसे नाहीत!
बीसीसीआय
| Updated on: May 03, 2021 | 10:31 AM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय (BCCI) जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखलं जातं. विविध स्पर्धांच्या माध्यमातून बीसीसीआय खेळाडूंवर अमाप पैसे उधळते. पण आता बीसीसीआयचा दुसरा चेहरा उघड झाला, तो चेहरा लाजीरवाणा आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडू्ंवर पैशांची उधळण होत असते तर दुसरीकडे मात्र काही खेळाडूंना बीसीसीआय सापेक्ष वागणूक देत असल्याचं समोर आलंय. (BCCI did not Pay Prashant Singh Match Fees Last 2 Year)

प्रशांत सिंगला 2 वर्षापासून मॅच फी नाही

बिहारचा 21 वर्षीय क्रिकेटपटू प्रशांत सिंहला गेल्या 2 वर्षांपासून बीसीसीयने सामन्याची फी दिलेली नाहीय. प्रशांत सिंह बिहारच्या अंडर 23 संघाचा सदस्य आहे. प्रशांत सध्या कठीण परिस्थितीतून जातोय. त्याची आई आणि मोठ्या भावाची सध्या तब्येत ठीक नाहीय. अशा परिस्थितीत त्याला पैशांची निकड आहे.

बिहारच्या क्रिकेटपटूंना सामन्याची फीच नाही!

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयतर्फे दोन वर्षांपासून बिहारच्या क्रिकेटपटूंना सामन्याची फी देण्यात आलेली नाही. बिहारच्या अंडर -23, अंडर -19 आणि सिनिअर संघ अद्याप 2019-20 आणि 2020-21 हंगामातील सामना फी च्या प्रतीक्षेत आहेत.

बीसीसीआय खेळाडूंना पैसे कसे देते?

बीसीसीआयने नुकतीच सय्यद मुश्ताक अली टी -20 ट्राफी आणि विजय हजारे ट्रॉफीचे 50 षटकांचे आयोजन केले होते. यापैकी 50 षटकांच्या सामन्यासाठी 25 हजार रुपये फी आणि टी -20 सामन्यासाठी 12,500 रुपये फी आहे. त्याचबरोबर बीसीसीआय अंडर -23 संघातील खेळाडूंना चार दिवसीय सामन्यासाठी 63 हजार आणि एकदिवसीय सामन्यासाठी 17,500 रुपये देते.

(BCCI did not Pay Prashant Singh Match Fees Last 2 Year)

हे ही वाचा :

IPL 2021 : ‘विराटसेना’ निळा ड्रेस घालून मैदानात उतरणार, कोरोना योद्ध्यांना मदत करण्याचा ‘बंगळुरु’ पॅटर्न!

IPL 2021 : रबाडाच्या एक्सप्रेसने गेलच्या गाडीला ब्रेक, Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मानलं भावा तुला…!’

IPL 2021 Purple Cap | हर्षल पटेलकडे Purple Cap कायम, आवेश खान आणि ख्रिस मॉरिसमध्ये कडवी झुंज

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.