AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Eng : मँचेस्टर कसोटी ड्रॉ, गौतम गंभीरसह तिघांबद्दल BCCI चा मोठा निर्णय

भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर बरेच काही बदलू शकते. गौतम गंभीरसह 3 जणांबद्दल बीसीसीआय मोठा निर्णय घेणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हा निर्णय कधी आणि का घेतला जाईल, त्याबद्दल जाणून घेऊया.

Ind vs Eng : मँचेस्टर कसोटी ड्रॉ, गौतम गंभीरसह तिघांबद्दल BCCI चा मोठा निर्णय
BCCI घेणार मोठा निर्णय Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 28, 2025 | 8:46 AM
Share

मँचेस्टर कसोटीचा निकाल अनिर्णित राहिला. म्हणजेच, या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेची स्कोरलाइन सध्या 1-2 अशी आहे. पण, याचदरम्यान एक मोठा रिपोर्ट येत आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की बीसीसीआय लवकरच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह 3 जणांबद्दल मोठा निर्णय घेऊ शकते. टीम इंडियाशी संबंधित दोन लोकांबद्दलही अशीदेखील चर्चा सुरू आहे की , त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, बीसीसीआयची ही कारवाई इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियाच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर असेल.

गौतम गंभीरसह 3 जणांबद्दल बीसीसीआय घेणार मोठा निर्णय – रिपोर्ट

द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना बीसीसीआय कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र, आशिया कप 2025 नंतर आणि या वर्षी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी, ते मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह 3 जणांवर मोठे निर्णय घेऊ शकते. इथे 3 जणांचा अर्थ गौतम गंभीर, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रायन देशनेट असा आहे.

बॉलिंग आणि फील्डिंग कोच जाणार बाहेर ?

बीसीसीआयचा असं मानणं की मॉर्न मॉर्केल यांच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाच्या गोलंदाजीत फारशी सुधारणा झालेली नाही. फील्डिंगमध्ये रायन डेस्कॉटचीही अशीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवल जाऊ शकतो. गौतम गंभीरच्या आग्रहावरून मोर्ने मॉर्केल आणि रायन देशनेट यांनी टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये प्रवेश केला. पण मुख्य प्रशिक्षक म्हणून बीसीसीआय गौतम गंभीरला कायम ठेवू शकते.

या सिलेक्टर्सवरही कुऱ्हाड ?

रिपोर्टनुसार, बीसीसीआय सध्या गौतम गंभीरला संधी देण्याच्या मनःस्थितीत आहे, जेणेकरून तो संघाला संक्रमणाच्या टप्प्यातून बाहेर काढू शकेल. अहवालात असेही म्हटले आहे की चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि सिलेक्टर शिव सुंदर दास यांच्यावरही बीसीसीआचा चाबूक चालू शकतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.