महिला दिनीच BCCI चा भेदभाव, पुरुषांना तगडी रक्कम, महिलांना तुटपुंजी

सचिन पाटील

Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई: बीसीसीआयने महिला दिनीच भारतीय महिला क्रिकेटपटूंशी भेदभाव केल्याचं दिसून येत आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या नव्या कराराची यादी जाहीर केली. या करारात पुरुष खेळाडू आणि महिला खेळाडूंच्या मानधनात मोठी तफावत असल्याचं दिसून येत आहे. पुरुषांच्या ए प्लस श्रेणीतील एका खेळाडूला 7 कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र दुसरीकडे या करारातील सर्व 20 महिला खेळाडूंना मिळून केवळ 4 […]

महिला दिनीच BCCI चा भेदभाव, पुरुषांना तगडी रक्कम, महिलांना तुटपुंजी

मुंबई: बीसीसीआयने महिला दिनीच भारतीय महिला क्रिकेटपटूंशी भेदभाव केल्याचं दिसून येत आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या नव्या कराराची यादी जाहीर केली. या करारात पुरुष खेळाडू आणि महिला खेळाडूंच्या मानधनात मोठी तफावत असल्याचं दिसून येत आहे.

पुरुषांच्या ए प्लस श्रेणीतील एका खेळाडूला 7 कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र दुसरीकडे या करारातील सर्व 20 महिला खेळाडूंना मिळून केवळ 4 कोटी 60 लाख रुपये मिळणार आहेत. पुरुष संघाच्या एका खेळाडूला 7 कोटी आणि सर्व महिला खेळाडूंना मिळून 4 कोटी 60 लाख हा खूपच दुजाभाव असल्याची भावना वर्तवली जात आहे. ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 पर्यंत हा करार असेल.

कोणत्या श्रेणीत कुणाला संधी?

A+ श्रेणी – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह

A श्रेणी – महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

 B श्रेणी – हार्दिक पांड्या, केएल राहुल, उमेश यादव, युजवेंद्र चहल

C श्रेणी – केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू, मनीष पांडे, हनुमा विहारी, खलील अहमद, रिद्धिमान साहा

 कोणाला किती रक्कम मिळते?

A+ श्रेणी – वर्षाला 7  कोटी रुपये

A श्रेणी – वर्षाला 5  कोटी रुपये

B श्रेणी – वर्षाला 3  कोटी रुपये

C श्रेणी –  वर्षाला 1  कोटी रुपये

महिला टीम

पुरुषांशिवाय महिला खेळाडूंची करार यादी बीसीसीआयने जाहीर केली. भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि पूनम यादव यांचा ए श्रेणीत समावेश आहे.  

तर बी श्रेणीत एकता बिश्त, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, दिप्ती शर्मा, जेमिमाह यांना स्थान मिळालं.

याव्यतिरिक्त राधा यादव, हेमलता, अनुजा पाटील, वी. कृष्णामूर्ति, मानसी जोशी, पूनम राऊत, मोना, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, तान्या भाटिया, पूजा यांचा समावेश सी गटात करण्यात आला आहे.

ए ग्रेडमधील महिलांना 50 लाख, बी ग्रेडमध्ये 30 लाख आणि सी ग्रेडमध्ये वार्षिक 10 लाख रुपये दिले जातात.

संबंधित बातम्या

BCCI च्या ए प्लस श्रेणीत केवळ 3 खेळाडू, 7 कोटींसाठी कोण पात्र?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI