Cricket Rules : एकाच चेंडूवर आऊट होणार 2 फलंदाज, क्रिकेटमध्ये लवकरच येणार चार नवीन क्रांतीकारी नियम
Cricket Rules : क्रिकेटला अजून इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आणि वेग वाढवण्यासाठी नवीन नियमांची चर्चा सुरु आहे. बिग बॅश लीगच्या पुढच्या सीजनमध्ये काही क्रांतीकारी बदल पहायला मिळू शकतात. कुठल्या नियमांबद्दल चर्चा सुरु आहे, जाणून घेऊया.

क्रिकेटमध्ये ICC सर्वोच्च संस्था असून ते या खेळाचे नियम बनवतात. पण क्रिकेट विश्वात अनेक खासगी T20 लीग सुद्धा चालतात. या टी 20 लीग्स क्रिकेटला अजून इंटरेस्टिंग बनवण्यासाठी काही नियम बनवतात. हे नियम फक्त त्या लीग पुरता मर्यादीत असतात. त्या नियमांच आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी काही संबंध नसतो. भारतात आयपीएल T20 लीगमध्ये असे नियम पहायला मिळाले आहेत. IPL मध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा नियम वापरला जातो. ऑस्ट्रेलियात पुढच्या बिग बॅश लीगच्या सीजनसाठी काही नव्या नियमांची चर्चा सुरु झाली आहे. क्रिकेटला अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी हे नियम बनवण्यात येतील. यात काही नियम खूपच वेगळे असतील.
डेजिगनेटेड हिटर
बिग बॅश लीगमध्ये सर्वात आधी डेजिगनेटेड हिटर नियमाची चर्चा आहे. आयपीएलमधल्या इम्पॅक्ट प्लेयर सारखा हा नियम आहे. इम्पॅक्ट प्लेयर नियमात खेळाडू बदलला जातो. डेजिगनेटेड हिटरमध्ये दोन्ही टीम्स आपपाल्या प्लेइंग इलेव्हनमधून एका खेळाडूला बॅटिंगसाठी नॉमिनेट करु शकतात. त्या खेळाडूला फिल्डिंग करण्याची गरज नसेल.
बॅक टू बॅक ओव्हर
त्याशिवाय एकाच एंडकडून बॅक टू बॅक ओव्हर टाकण्याची परवानगी देण्यावर विचार सुरु आहे. कॅप्टनची इच्छा असेल, तर तो गोलंदाजाकडून एका एन्डकडून 2 ओव्हर टाकून घेऊ शकतो.
डबल प्ले
सध्या क्रिकेटमध्ये एका चेंडूवर जास्तीत जास्त एक फलंदाज आऊट होतो. पण बिग बॅश लीग स्पर्धेत यामध्ये बदल होऊ शकतो. पुढच्या सीजनमध्ये डबल प्ले चा नियम येऊ शकतो. या नियमातंर्गत एकाच चेंडूवर 2 फलंदाज आऊट होऊ शकतात. यामध्ये एका फलंदाजाला कॅच आऊट किंवा बोल्ड केल्यानंतर दुसऱ्याला रनआऊट केलं जाऊ शकतं.
मेडन ओव्हर टाकल्यावर काय?
मेडन ओव्हर संदर्भातही बिग बॅशमध्ये इंटरेस्टिंग निर्णय होऊ शकतो. मेडन ओव्हर म्हणजे एकाच षटकात सहा निर्धाव चेंडू. एखादा गोलंदाज मेडन ओव्हर टाकण्यात यशस्वी ठरला, त्याने एकही धाव दिली नाही, तर फलंदाजाला बाद देता येऊ शकतं किंवा आणखी वेरिएशन करत त्या गोलंदाजाला कोट्यापेक्षा जास्त म्हणजे पाचवी ओव्हर टाकण्याची परवानगी दिली जाईल. WBBL आणिBBL साठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी या नियमांबद्दल चर्चा सुरु आहे. रिपोर्टनुसार, क्रिकेटला अजून गतिमान करण्यासह खेळाडूंचा वर्कलोड कमी करण्यासाठी असा निर्णय घेतला जाऊ शकतो.
