IND vs PAK : टीम इंडिया विरुद्ध कशी असेल पाकिस्तानची Playing 11, या दोन खेळाडूंना बाहेर बसवणार का?
IND vs PAK : बांग्लादेशला सलामीच्या सामन्यात हरवल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध Playing 11 मध्ये बदल होण्याची शक्यता कमी दिसत आहे. पण न्यूझीलंडकडून दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये काही बदल होऊ शकतात. कुठल्या खेळाडूंचा पत्ता कट होणार? त्या बद्दल जाणून घ्या.

भारताविरुद्ध बाबर आजाम धावा करणार की, शाहीन शाह आफ्रिदी आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणार की मोहम्मद रिजवान आपल्या कॅप्टनशिपने मॅच जिंकवणार? पाकिस्तानकडून कोण दमदार प्रदर्शन करेल? या प्रश्नांच उत्तर वेळेबरोबर मिळेलच. पण त्याआधी हे जाणून घेणं आवश्यक आहे की, भारताविरुद्ध पाकिस्तान कुठल्या प्लेइंग इलेव्हनसह उतरणार आहे. दुबईत खेळल्या जाणाऱ्या या महामुकाबल्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन काय असेल? जाणून घेऊया.
स्टार फलंदाज बाबर आजम ओपनिंगसाठी उतरणार आहे. त्याच्यासोबत इमाम उल हक सलामीला येऊ शकतो. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात दुखापत झाल्यानंतर फखर जमां चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर गेला. त्याच्या जागी इमामचा टीममध्ये समावेश केला. तिसऱ्या नंबरवर कॅप्टन आणि विकेटकीपर मोहम्मज रिजवान येईल.
कोणाला बाहेर बसवलं जाईल?
फखर जमांच्या जागी सऊद शकील न्यूझीलंड विरुद्ध ओपनिंगसाठी मैदानात उतरला होता. पण त्याने 19 चेंडूत 6 धावा केल्या. त्याच्याजागी कामरान गुलामला संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर उपकर्णधार सलमान आगा येईल. न्यूझीलंड विरुद्ध त्याने 28 चेंडूत 42 धावा केल्या होत्या. खुशदिल शाहच टीममधील स्थान कायम राहील. त्याने 49 चेंडूत 69 धावा फटकावल्या होत्या. तैयब ताहिर न्यूझीलंड विरुद्ध फ्लॉप ठरला होता. त्याला बाहेर बसवलं जाऊ शकतं. त्याच्याजागी फहीम अशरफचा टीममध्ये समावेश होऊ शकतो.
पाकिस्तानच्या गोलंदाजीत काही बदल होतील का?
न्यूझीलंड विरुद्ध शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ हे तीन प्रमुख गोलंदाज खेळले होते. स्पिन डिपार्टमेंटची जबाबदारी अबरार अहमदकडे आहे. न्यूझीलंड विरुद्ध नसीमने 10 ओव्हरमध्ये 63 धावा देऊन दोन आणि हॅरिसने 10 ओव्हरमध्ये 83 रन्स देऊन दोन विकेट काढले होते. शाहीनने एकही विकेट न काढता 68 धावा दिल्या होत्या. रिजवान आपल्या पेस अटॅकमध्ये कोणताही बदल करण्याची शक्यता कमी आहे.
दुबईमधील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरु शकते. भारतासाठी या तिघांपैकी कुठलाही गोलंदाज धोकादायक ठरु शकतो. एकमेव फुल टाइम स्पिनर अबरार टीममध्ये कायम राहील. पहिल्या मॅचमध्ये त्याने 10 ओव्हर्समध्ये 47 धावा देऊन एक विकेट काढलेला.
पाकिस्तानची संभाव्य Playing 11
बाबर आजम, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (कॅप्टन-विकेटकीपर), सलमान अली आगा, कामरान गुलाम, फहीम अशरफ, खुशदिल शाह, हारिस रौफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि अबरार अहमद.
