Team India : टीम इंडियाची दहशतच अशी की…सेमीफायनलआधी या खेळाडूने शोधलं पराभवाचं कारण
Team India : टीम इंडिया दिमाखात सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या फॉर्ममुळे प्रतिस्पर्धी टीममधील काही खेळाडू आतापासूनच चिंतातूर आहेत. उद्या पराभव झाल्यास त्यासाठी एक सबळ कारण त्यांनी आतापासूनच शोधून ठेवलय. टीम इंडियाचा उत्पांत्यफेरीचा सामना 4 फेब्रुवारीला होणार आहे.

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शानदार पद्धतीने पुढे जात आहे. बांग्लादेश आणि पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध आहे. त्याआधी टीम इंडियावर दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू रासी वॅन डर डुसैंने हल्लाबोल केला आहे. टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत एकाच मैदानावर खेळवण्यात येत आहेत. त्यावर रासी म्हणाला की, “भारताला फायदा का मिळतोय? हे समजून घेण्यासाठी रॉकेट सायन्सची आवश्यकता नाहीय” त्याशिवाय त्याने सेमीफायनलबद्दलही मोठ वक्तव्य केलय.
“टीम इंडियाला फायदा तर मिळतोय. पाकिस्तानने सुद्धा म्हटलं टीम इंडियाला फायदा आहे. जेव्हा तुम्ही एका हॉटेलमध्ये असता, एकाच मैदानावर प्रॅक्टिस करता, एकाच पीचवर खेळता तेव्हा नक्कीच फायदा मिळतो” असं रासी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला. , “भारताला फायदा का मिळतोय? हे समजून घेण्यासाठी रॉकेट सायन्सची आवश्यकता नाहीय. उलट टीम इंडियावर या स्थितीचा फायदा उचलण्याचा दबाव असेल” असं रासी म्हणाला.
या दोन टीम शर्यतीत
टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. ग्रुप बी मधून ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये दाखल होणारी पहिली टीम ठरली आहे. आता ग्रुप बी मधून दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन टीम शर्यतीत आहेत. “भारताविरुद्ध कुठल्याही टीमला सेमीफायनल आणि फायनल खेळण्यासाठी दुबईला जावं लागणार आहे. जाणाऱ्या टीमसाठी नवीन स्थिती असेल. पण टीम इंडियाला दुबईच्या पीचची सवय झालेली असेल” असं रासी म्हणाला.
जुळवून घेणं सोप नसेल
टीम इंडियाने मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेला T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हरवलं होतं. आता पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल किंवा सेमीफायनलमध्ये दोन्ही टीम्सचा आमना-सामना होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेसाठी दुबईच्या खेळपट्टीशी जुळवून घेणं सोप नसेल.
पॅट कमिन्स, अकिब जावेद काय म्हणाले?
याआधी पॅट कमिन्स आणि पाकिस्तानचे हेड कोच अकीब जावेद यांनी सुद्धा या मुद्यावर प्रश्न उपस्थित केले होते. “ते कुठल्यातरी कारणामुळे दुबईत खेळत आहेत. पण निश्चितपणे एकच पीच आणि एकच मैदानावर खेळण्याचा फायदा मिळेल” असं अकीब जावेद म्हणाले . पॅट कमिन्स म्हणाला की, “टीम इंडिया आधीपासूनच मजबूत आहे. त्यांना दुबईत सर्व सामने खेळण्याचा नक्कीच फायदा होईल”
