Video: खुर्च्या तोडल्या, बाटल्या फेकल्या; मेस्सीच्या त्या कृत्यामुळे चाहते संतापले
Video: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारतात आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. पण मेस्सी स्टेडीयममधून लवकर निघून गेल्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आहे. कोलकात्यात पहिल्या दिवशी त्यांनी आपल्या ७० फूट उंच प्रतिमेचे अनावरण केले. साल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सीला भेटण्यासाठी हजारो चाहते पोहोचले होते, पण खराब नियोजनामुळे त्याला लवकर परतावे लागले. मेस्सीने स्टेडियम लवकर सोडल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गर्दीमुळे मेस्सी गेला निघून
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्याला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये मोठा गोंधळ घातला. चाहते सुरक्षा रक्षकांचा घेरा तोडून मैदानात पोहोचले आणि काहींनी स्टेडियमच्या खुर्च्याही तोडल्या. खरे तर चाहते आपल्या या स्टार फुटबॉलपटूला भेटू शकले नाहीत म्हणून नाराज होते. लोक त्याला भेटण्याची आशा लावून बसले होते, पण चाहत्यांची गर्दी पाहून मेस्सीला स्टेडीममधून बाहेर पडावे लागले. तो थेट हॉटेलच्या दिशेने रवाना झाला. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी तासनतास स्टेडीयमध्ये उभे असलेल्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
#WATCH | Kolkata, West Bengal: Angry fans threw bottles and chairs from the stands at Kolkata’s Salt Lake Stadium
Star footballer Lionel Messi has left the Salt Lake Stadium in Kolkata.
More details awaited. pic.twitter.com/mcxi6YROyr
— ANI (@ANI) December 13, 2025
चाहत्यांनी केली स्टेडीयमची नासधुस
लिओनेल मेस्सीने लवकर मैदान सोडल्यानंतर चाहत्यांनी साल्ट लेक स्टेडियममध्ये खुर्च्या तोडल्या आणि अधिकाऱ्यांवर वस्तू फेकण्यास सुरुवात केली. ते फक्त मेस्सीच्या लवकर निघून जाण्याने नव्हे, तर अधिकाऱ्यांच्या वागण्यानेही त्रस्त होते. खराब आयोजनामुळे चाहत्यांना फुटबॉलपटूला नीट पाहता देखील आले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की मेस्सीच्या लवकर निघून जाण्यानंतर साल्ट लेक स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी खुर्चा तोडल्या. तिथे जोरजोरात हूटिंगच्या आवाजा येत होता, तर पोलिस आणि अधिकाऱ्यांवर बाटल्या फेकल्या गेल्या.
मेस्सीने साल्ट लेक स्टेडियम लवकर सोडल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर प्लास्टिकच्या बाटल्या आणि पाकिटे फेकली गेली. तिघे खेळाडूही गर्दीमुळे थोडे अस्वस्थ दिसत होते. एका वेळी त्यांना चालण्यासही त्रास झाला. कोलकात्यातील स्टेडीयममध्ये फक्त मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी केली होती. तोच लवकर निघून गेल्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केला. प्लास्टिकच्या बाटल्या आणि पाकिटे फेकली. गर्दी इतकी प्रचंड होती की खेळाडूंना चालण्यासाठीही जागा नव्हती, ज्यामुळे मेस्सी टनेलच्या मार्गाने बाहेर पडले. त्यानंतर लगेच स्टँड्समध्ये गोंधळ सुरु झाला.
