AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेन्नई 10 पैकी 8 वेळा फायनलमध्ये, कुणाचं पारडं जड?

CSKvsDC विशाखापट्टणम : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सनी पराभव करत, तब्बल आठव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक दिली. तर या पराभवामुळे पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचण्याचं दिल्लीच्या युवा टीमचं स्वप्न धुळीला मिळालं. आता रविवारी 12 मे रोजी चेन्नईचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हैदराबादमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, विशाखापट्टणमध्ये चेन्नई […]

चेन्नई 10 पैकी 8 वेळा फायनलमध्ये, कुणाचं पारडं जड?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

CSKvsDC विशाखापट्टणम : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सनी पराभव करत, तब्बल आठव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक दिली. तर या पराभवामुळे पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचण्याचं दिल्लीच्या युवा टीमचं स्वप्न धुळीला मिळालं. आता रविवारी 12 मे रोजी चेन्नईचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हैदराबादमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.

दरम्यान, विशाखापट्टणमध्ये चेन्नई विरुद्ध दिल्ली हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने 20 षटकात 9 बाद 147 धावा केल्या. चेन्नईने हे आव्हान केवळ 4 विकेट्सच्या मोबदल्यात 19 षटकात पूर्ण केलं.

चेन्नईकडून फॅफ डू प्लेसिसने 39 चेंडूत 50 आणि शेन वॉटसनने 32 चेंडूत 50 धावा ठोकत 81 धावांची सलामी दिली. त्यामुळे चेन्नईचा विजय सोपा झाला.

त्याआधी चेन्नईच्या गोलंदाजांनीही प्रभावी मारा केला. ड्वेन ब्राव्हो 19 धावात 2 विकेट, रवींद्र जाडेजा 2, दीपक चहर 2 आणि हरभजन सिंहनेही 2 विकेट घेत, दिल्लीच्या फलंदाजांना जखडून ठेवलं.

दिल्लीकडून ऋषभ पंतने 25 चेंडूत सर्वाधिक 38 धावा केल्या. त्यामुळेच दिल्लीला सन्मानजनक 147 धावांपर्यंत मजल मारता आली होती.

आठव्यांदा फायनलमध्ये

चेन्नई सुपर किंग्जने 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2018 आणि 2019 या वर्षात आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. यापैकी 2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नईने विजय मिळवला. त्यामुळे आयपीएलची तीन जेतेपदं चेन्नईच्या नावावर आहेत.

धोनी नवव्यांदा फायनल खेळणार

चेन्नईने आठव्यांदा फायनलमध्ये धडक दिली असली, तर कर्णधार धोनी नवव्यांदा फायनल खेळणार आहे. चेन्नईकडून आठव्यांदा तर पुणे सुपरजायंट्सकडून एकदा धोनी फायनलमध्ये खेळला आहे. धोनीनंतर सर्वाधिक फायनलमध्ये खेळणाऱ्यांमध्ये सुरेश रैनाचा नंबर लागतो. रैना 7 वेळा फायनलमध्ये खेळला आहे.

मुंबई-चेन्नई चौथ्यांदा फायनलमध्ये आमने-सामने

दरम्यान, आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई आणि चेन्नई चौथ्यांदा जेतेपदासाठी भिडणार आहेत. आतापर्यंत फायनलमध्ये मुंबईने दोनवेळा तर चेन्नईने एकदा विजय मिळवला. मुंबईने यंदा क्वालिफायर 1 मध्ये चेन्नईला हरवूनच फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई पाचवेळा फायनलमध्ये

चेन्नईनंतर मुंबई इंडियन्सचा नंबर लागतो. मुंबई इंडियन्स पाच वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी 2010, 2013, 2015, 2017 आणि 2019 अशी पाचवेळा मुंबईने फायनलमध्ये धडक दिली. यापैकी मुंबईने 2013,15 आणि 17 मध्ये विजय मिळवला आहे. आता 2019 मध्येही विजय मिळवून सर्वाधिक 4 जेतेपदं पटकावण्याचा मानस रोहित ब्रिगेडचा असेल.

मुंबई विरुद्ध चेन्नई फायनलचा इतिहास

2010 – नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने मुंबईवर 22 धावांनी मात केली.

2013 – कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर मुंबईने चेन्नईवर 23 धावांनी विजय मिळवला.

2015 – ईडन गार्डन्सवर मुंबईने 41 धावांनी चेन्नईवर मात केली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.