AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 वर्षाच्या मुलीचा झोपेतच मृत्यू, आता CWG 2022 क्वीन्स बॅट रिलेत आई होणार सहभागी

आईच (Mother) आपल्या मुलांबरोबर (Child) नातंच वेगळं असतं. मुलांचं स्वप्न साकार करण्यासाठी आई आपली ताकत पणाला लावते. मग मुलांकडून साथ मिळो, अथवा न मिळो.

14  वर्षाच्या मुलीचा झोपेतच मृत्यू, आता CWG 2022 क्वीन्स बॅट रिलेत आई होणार सहभागी
Sky GardnerImage Credit source: WolvesCouncil Twitter
| Updated on: Jul 25, 2022 | 7:10 AM
Share

मुंबई: आईच (Mother) आपल्या मुलांबरोबर (Child) नातंच वेगळं असतं. मुलांचं स्वप्न साकार करण्यासाठी आई आपली ताकत पणाला लावते. मग मुलांकडून साथ मिळो, अथवा न मिळो. आई मुलांच स्वप्न स्वत: जगते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मेहनत घेते. ते स्वप्न साकार झाल्यानंतरच तिला मनशांती मिळते. अशीच एक आई आपल्या मुलीच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची तयारी करतेय. पण या आईला स्वत:ला मानसिक दृष्टया तितकचं मजबूतही कराव लागणार आहे. लॉरा आपल्या 14 वर्षाच्या मुलीच्या जागी कॉमनवेल्थ गेम्सआधी (CWG) क्वीन बॅटन रिले मध्ये सहभागी होणार आहे.

तिला निवड झाल्याचं समजलच नाही

लॉराची मुलगी स्काई गार्डनरचा यावर्षी मार्च महिन्यात ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चढ-उतारांनी भरलेल्या आयुष्यात कधीही हार न मानण्याच्या स्वभावामुळे स्काईला शाळेतील शिक्षकांनी रिलेसाठी नॉमिनेट केलं होतं. पण दुर्देवाने स्काईला तिची रिलेसाठी निवड झालीय हे कधी समजलच नाही. आता स्काईच्या जागी तिची आई लॉरा या रिले मध्ये सहभागी होणार आहे.

शाळेच्या सहलीवर असताना झाला मृत्यू

14 वर्षाच्या स्काईने प्रकृतीशी संबंधित वेगवेगळ्या समस्यांमधून स्वत:ला बऱ्यापैकी सावरलं होतं. यात ब्रेन मध्ये ब्लीडिंग, कार्डियक अरेस्ट आणि 2 ओपन हार्ट सर्जरी सुद्धा आहेत. 10 मार्चला स्काई शाळेतून एका सहलीला गेली होती. तिथे कोरोनरी हार्टच्या आजाराबरोबर ती आयुष्याची लढाई हरली. झोपेमध्येच तिने जगाचा निरोप घेतला. “स्काईला रिलेसाठी नॉमिनेट झाल्याचं समजलं असतं, तर भरपूर आनंद झाला असता. पण तिला हे कळण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या स्मृतीमध्ये रिलेत सहभागी होणं, सन्मानाची बाब आहे” असं लॉरा म्हणाली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.