AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

17 वेळा ज्यांनी हरवलं, CWG क्रिकेटच्या सेमीफायनल मध्ये टीम इंडियाचा त्याच संघाविरुद्ध सामना

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये क्रिकेटचे सेमीफायनल सामने कुठल्या चार संघांमध्ये होणार? ते निश्चित झालं आहे. भारत, यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार टीम्स मध्ये सेमीफायनल रंगणार आहे.

17 वेळा ज्यांनी हरवलं, CWG क्रिकेटच्या सेमीफायनल मध्ये टीम इंडियाचा त्याच संघाविरुद्ध सामना
womens teamImage Credit source: twitter
| Updated on: Aug 05, 2022 | 4:29 PM
Share

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये क्रिकेटचे सेमीफायनल सामने कुठल्या चार संघांमध्ये होणार? ते निश्चित झालं आहे. भारत, यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार टीम्स मध्ये सेमीफायनल रंगणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा ज्या संघाविरुद्ध सामना आहे, त्यांनी टी 20 मध्ये एकदा, दोनदा नाही तर चक्क 17 वेळा भारतीय महिला संघाचा पराभव केलाय. भारतीय संघाला त्या टीम विरुद्ध फारसे सामने जिंकण जमलेलंच नाही. त्यामुळे टीम इंडियाचा कॉमनवेल्थच्या फायनल मध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नसेल. त्यांना फायनल मध्ये पोहोचण्यासाठी सर्वोत्तम क्रिकेट खेळावं लागेल. आधी काय झालं, ते विसरुन मैदानात उतरावं लागेल.

कोण कोणाविरुद्ध खेळणार

CWG मध्ये भारत सेमीफायनल मध्ये इंग्लंडला भिडणार आहे. दुसरी सेमीफायनल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांमध्ये होईल. दोन्ही सामने 6 ऑगस्टला होणार आहेत.

इंग्लंड विरुद्ध 17 T20I सामने हरलेत

सेमीफायनल ते फायनल पर्यंतचा प्रवास भारतीय महिला क्रिकेट संघासाठी किती कठीण असेल, ते आकड्यांवरुन समजून घ्या. भारत आणि इंग्लंडच्या महिला संघात टी 20 मध्ये आतापर्यंत 22 सामने झालेत. त्यात 22 पैकी 17 वेळा इंग्लंडची टीम जिंकली आहे. फक्त 5 वेळाच भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे.

इंग्लंडचा संघ आपल्या घरात खेळतोय, ही सुद्धा त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे. होम कंडीशन्सचा त्यांना फायदा मिळेल. इंग्लंडने मायदेशात भारताविरुद्ध 8 टी 20 सामने खेळलेत. त्यातही त्यांचा दबदबा कायम आहे. इंग्लंडने 6 तर भारताने 2 सामने जिंकलेत. cwg 2022, cwg 2022 cricket semi final, india vs england, australia vs new zealand,

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.