AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2022, CWG 2022 Athletics : प्रियांका गोस्वामीनं जिंकलं रौप्यपदक, महिलांच्या 10 हजार मीटर शर्यतीत रचला इतिहास

CWG 2022, CWG 2022 Athletics : 2021 फेब्रुवारीमध्ये प्रियांकाने विक्रमी वेळेसह 20 किमीची शर्यत जिंकली. प्रियंका गोस्वामी टोकियो ऑलिम्पिकसाठी 1:28.45 च्या विक्रमी वेळेसह पात्र ठरली. मुझफ्फरनगरच्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच पदक जिंकले.

CWG 2022, CWG 2022 Athletics : प्रियांका गोस्वामीनं जिंकलं रौप्यपदक, महिलांच्या 10 हजार मीटर शर्यतीत रचला इतिहास
प्रियांका गोस्वामीImage Credit source: tv9
| Updated on: Aug 06, 2022 | 4:35 PM
Share

नवी दिल्ली : CWG 2022 Athletics भारतीय धावपटू प्रियांका गोस्वामी (Priyanka Goswami) हिनं महिलांच्या 10 हजार मीटर रेस वॉकमध्ये अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे. या खेळाडूनं सर्वोत्तम कामगिरी करताना देशाला पदक मिळवून दिलंय. प्रियांकानं ही शर्यत 43:38.82 मध्ये पूर्ण केली. प्रियंका गोस्वामीने या विजयासह इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG 2022) पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. प्रियांका गोस्वामीनेही टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते पण ती 17व्या स्थानावर राहिली. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत या खेळाडूने अप्रतिम कामगिरी करत इतिहास रचला. प्रियंका गोस्वामीला आधी जिम्नॅस्ट बनायचे होते. पण अ‍ॅथलेटिक्समध्ये मिळालेल्या बक्षिसांकडे ती आकर्षित झाली आणि तिने हा खेळ हाती घेतला. 2021 फेब्रुवारीमध्ये प्रियांकाने विक्रमी वेळेसह 20 किमीची शर्यत जिंकली. प्रियंका गोस्वामी टोकियो ऑलिम्पिकसाठी 1:28.45 च्या विक्रमी वेळेसह पात्र ठरली. मुझफ्फरनगरच्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच पदक जिंकले आहे.

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारतीय खेळाडूंनी पदक जिंकणे सुरूच ठेवले आहे. खेळाच्या नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारी भारताचे पदक खातेही उघडले आहे. अ‍ॅथलीट प्रियांका गोस्वामी हिने महिलांच्या 10 किमी रेस वॉकमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. बस कंडक्टरची मुलगी पदक जिंकून इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. प्रियांका ही उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील गडमलपूर सांगरी या गावची आहे.

तिसरे पदक

अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे हे तिसरे पदक आहे. प्रियांकापूर्वी, तेजस्वीन शंकर (उंच उडीत कांस्य) आणि एम श्रीशंकर (लांब उडीमध्ये स्लिव्हर) यांनी चालू राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऍथलेटिक्समध्ये पदके जिंकली.

प्रियांकाचे वैयक्तिक सर्वोत्तम

प्रियांकाने रौप्यपदक जिंकले. तिनं घड्याळात 43:38 वाजले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या जेमिमा माँटॅगने 42:34 च्या वेळेसह सुवर्णपदक पटकावले. केनियाच्या एमिली वामुसी एनजीने 43:50 सह कांस्यपदक जिंकले.

27 पदकांवर कब्जा

राष्ट्रकुल 2022 च्या पदकतालिकेत भारत सध्या सहाव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत एकूण 27 पदके जिंकली आहेत, ज्यामध्ये 9 सुवर्ण, 9 रौप्य आणि तब्बल कांस्य पदके आहेत. भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत. भारताने वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदकांसह 10 पदके जिंकली.

आधी जिम्नॅस्ट बनायचे होते….

प्रियंका गोस्वामीला आधी जिम्नॅस्ट बनायचे होते. पण अ‍ॅथलेटिक्समध्ये मिळालेल्या बक्षिसांकडे ती आकर्षित झाली आणि तिने हा खेळ हाती घेतला. 2021 फेब्रुवारीमध्ये प्रियांकाने विक्रमी वेळेसह 20 किमीची शर्यत जिंकली. प्रियंका गोस्वामी टोकियो ऑलिम्पिकसाठी 1:28.45 च्या विक्रमी वेळेसह पात्र ठरली. मुझफ्फरनगरच्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच पदक जिंकले आहे.

विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.