CWG 2022 : ज्युडोमध्येही भारताला सिल्व्हर मेडल, सुशिला देवीने बाजी मारलीच, 8 वर्षांचा वनवास संपवला

यावेळच पदक हे सुशिलासाठीही खास असणार आहे कारण 8 वर्षांनंतर सुशीलाने CWG मध्ये पुन्हा पदक जिंकले आहे. मात्र यावेळीही तिची गोल्डची प्रतीक्षा कायम राहिली आहे. आगामी काळात गोल्डलाही तिला गवसणी घालता येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

CWG 2022 : ज्युडोमध्येही भारताला सिल्व्हर मेडल, सुशिला देवीने बाजी मारलीच, 8 वर्षांचा वनवास संपवला
ज्युडोमध्येही भारताला सिल्व्हर मेडल, सुशिला कुमारीने बाजी मारलीच, 8 वर्षांचा वनवास संपवलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 11:04 PM

CWG 2022 : वेटलिफ्टिंगमध्ये (CWG 2022 Weightlifting) विजयाची पताका फडकवल्यानंतर आता भारताच्या आणखी एका कन्येने राष्ट्रकुल स्पर्धेत (birmingham commonwealth games 2022) देशाला पदक मिळवून दिले आहे. बर्मिंगहॅममध्ये भारताच्या खात्यात रौप्य पदकाची भर टाकणाऱ्या जुडोका सुशीला देवीबद्दल (Sushila Devdi Silver Medal In Judo) सध्या जगभर चर्चा आहे. सुशीला देवीने ज्युदोच्या 48 किलो गटात हे पदक जिंकले. सोमवार 1 ऑगस्ट रोजी झालेल्या दंडामध्ये सुशीला दक्षिण आफ्रिकेच्या जुडोकाकडून पराभूत झाली. मणिपूरच्या या खेळाडूने प्रिसिला मोरांडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. यावेळच पदक हे सुशिलासाठीही खास असणार आहे कारण 8 वर्षांनंतर सुशीलाने CWG मध्ये पुन्हा पदक जिंकले आहे. मात्र यावेळीही तिची गोल्डची प्रतीक्षा कायम राहिली आहे. आगामी काळात गोल्डलाही तिला गवसणी घालता येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

आठ वर्षांनंतर मिळालेल्या संधीची चांदी

सुशीला देवी दुसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाली आहे. ग्लासगो येथे झालेल्या गेम्समध्ये ती पहिल्यांदाच उतरली होती. 2014 मध्ये सुशीलाने रौप्य पदक जिंकले होते. यासह ती राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला जुडोका ठरली. पण गेल्या वेळी गोल्ड कोस्टमध्ये 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडो हा खेळ नव्हता, त्यामुळे सुशीला देवी सहभागी होऊ शकली नाही. पण आता पूर्ण 8 वर्षांनंतर सुशीला देवीला राष्ट्रकुल स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि ती यशस्वीही झाली.

सुशिलाचे सुरूवातीचे करिअर

सुशीला देवी ही मूळची मणिपूरची आहे. 1995 साली जन्मलेल्या सुशीलाने वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी ज्युडोचे प्रशिक्षण सुरू केले. तिचे काका स्वतः आंतरराष्ट्रीय ज्युडो खेळाडू राहिले आहेत. त्याच वेळी तिचा मोठा भाऊ ज्युदोमध्ये दोन वेळा सुवर्णपदक विजेता आहे, जो सध्या बीएसएफमध्ये काम करतो. सुशीला देवीला 2017 मध्ये मणिपूर पोलिसात नोकरी मिळाली आणि सध्या ती इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे.

अलिकडच्या वर्षातील कारकीर्द

ती भारतातील महान जुडोका आहे. सुशिला 2012 साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरली होती आणि ही कामगिरी करणारी ती भारतीय इतिहासातील एकमेव खेळाडू आहे. याशिवाय सुशीला देवीने 2019 च्या कॉमनवेल्थ ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. या खेळाडूने आशियाई ओपन चॅम्पियनशिप 2018 आणि 2019 मध्ये रौप्य पदक जिंकले. मात्र गेल्या वर्षी ताश्कंद ग्रँडस्लॅममध्ये सुशीला दुसऱ्या फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली होती. पण आता तिने बर्मिंगहॅममध्ये पुन्हा जोरदार कमबॅक केलं आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.