सिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपवर नाव कोरणारी पहिली भारतीय होण्याचा मान मिळवल्यानंतर काँग्रेसने 'सिंधू तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस' असं शुभेच्छा देणारं ट्वीट केलं. त्यामुळे पक्ष सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरला आहे.

सिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने (PV Sindhu) चमकदार कामगिरी करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर सोशल मीडियावरुन सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. मात्र काँग्रेस पक्षाच्या (Congress) अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्वीटमुळे नेटिझन्सच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘सिंधू तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस’ असं काँग्रेसने शुभेच्छा देताना म्हटल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात झाली आहे.

‘बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय होण्याचा मान पटकावल्याबद्दल पीव्ही सिंधूचं अभिनंदन. तू तुझ्या देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहेस’ अशा आशयाचं ट्वीट काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये ‘आपल्या’ ऐवजी ‘तुझ्या देशाची’ हा शब्द वापरल्याने अनेक जणांनी काँग्रेसवर आक्षेप घेतला. त्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात झाली.

 

पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिने स्वित्झर्लंडमधील बासेल येथे झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा (World Badminton Championship) अंतिम सामना जिंकत इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.

रविवारी (25 ऑगस्ट) झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूची लढत जपानच्या नोजोमी ओकुहारा (Nozomi Okuhara) हिच्याशी झाली. 24 वर्षीय सिंधूने ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

‘तुझा? काँग्रेस हा पाकिस्तानी पक्ष असल्याचं तुम्ही सिद्ध करत आहात’ असा रिप्लाय एका ट्विटराईटने केला. अनेक जणांनी टोमणे मारुन आपला संताप व्यक्त केला आहे.

 

सिंधूकडून 2017 च्या पराभवाचा बदला

याआधी सिंधू 2018 मध्ये स्पेनच्या कॅरोलिना मरीन आणि 2017 मध्ये जपानच्या नोजोमी ओकुहाराविरोधात अंतिम सामना खेळली होती. मात्र दोन्ही वेळी तिला अंतिम सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. यावेळी मात्र, तिने आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर 2017 चा पराभवाचा वचपा काढला आणि ओकुहाराला पराभवाची धूळ चारली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *