AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीला टीममध्ये घेऊ नका, अनिल कुंबळेंच्या विधानामुळे नवा वाद; लोकांचा संताप!

यंदाच्या आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी पाहायला मिळत आहे. वैभव सूर्यवंशी एकदा मैदानात उतरला की चौकार आणि षटकार यांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. दरम्यान, अनिक कुंबळेंनी केलेल्या एका विधानाची सगळीकडे चर्चा होत आहे.

वैभव सूर्यवंशीला टीममध्ये घेऊ नका, अनिल कुंबळेंच्या विधानामुळे नवा वाद; लोकांचा संताप!
| Updated on: Apr 11, 2026 | 6:40 PM
Share

Vaibhav Suryavanshi : क्रिकेटर वैभव सूर्यवंशी या नावाचा वेगळा परिचय करून देण्याची गरज आहे. हा खेळाडू बॅट घेऊन मैदानात उतरला की चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पडतो. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये तो तुफानी फलंदाजी करताना दिसतोय. त्याचा हाच खेळ पाहून त्याला लवकरात लवकर भारतीय क्रिकेट संघात स्थान द्यावे, अशी मागणी केली जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तथा दिग्गज फिरकीपटू राहिलेल्या अनुिल कुंबळे यांनी मात्र वेगळेच मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या विचारांमुळे आता नवा वाद सुरू झाला आहे. जदयू पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी कुंबळेंच्या मतावर थेट आक्षेप व्यक्त केला आहे.

संजय झा नेमकं का भडकले?

संजय झा यांनी कुंबळेंनी केलेल्या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला सचिन तेंडुलकरने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रऐवेश केला होता. महान फुटबॉलपटू पेले आणइ लियोनेल मेस्सी यांनीही वयाच्या 16 व्या वर्षीच ब्राझील आणि बार्सिलोना टीममध्ये खेळायला सुरूवात केली होती. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आताच संधी देऊ नये, असा तर्क लावणे हे चुकीचे आहे. प्रतिभेला वयाची अट नसते, असं म्हणत संजय कुमार झा यांनी कुंबळे यांच्या मताशी असहमती दर्शवली आहे.

अनिक कुंबळे काय म्हणाले होते?

वैभव सूर्यवंशीला आताच इंडिया टीममध्ये सामील करून घेऊ नये, असे मत अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले आहे. अनिल कुंबळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मतानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वैभवचा भारतीय संघात समावेश करण्याची घाई करू नये. सर्वानीच त्याचा खेळ पाहिलेल आहे. त्याला फार काळ रोखून ठेवणं शक्य नमाही. परंतु लोकांच्या अपेक्षांमुळे त्याच्यावर वेगळा दबाव निर्माण होऊ शकतो. दहा वर्षावंतरही तो अवघ्या 25 वर्षांचा असेल. त्यामुळे त्याच्याकडे खूप वेळ आहे, असेही अनिल कुंबळे म्हणाले.

Follow Us
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक.
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत.
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.