AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धविराम नाहीच… इस्रायलकडून पुन्हा भीषण हल्ल्यांना सुरुवात, मध्यपूर्वेत तणाव वाढला

Israel : इस्रायलने हिज्बुल्लासोबत युद्धविराम नाकारला असून आक्रमक पवित्रा घेत लेबनॉनवर भीषण हल्ल्यांना सुरुवात केली आहे. यामुळे मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढला आहे.

युद्धविराम नाहीच... इस्रायलकडून पुन्हा भीषण हल्ल्यांना सुरुवात, मध्यपूर्वेत तणाव वाढला
Israel war Image Credit source: Google
| Updated on: Apr 11, 2026 | 6:46 PM
Share

इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला होता, मात्र आता दोन्ही देशांचे नेते शांतता चर्चा करण्यावर सहमत झाले आहेत. लवकरच दोन्ही देशांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. मात्र दुसरीकडे इस्रायलने आक्रमक पवित्रा घेतला असून लेबनॉनवर भीषण हल्ल्यांना सुरुवात केली आहे. इस्रायलने हिज्बुल्लासोबत युद्धविराम (सीजफायर) नाकारला आहे. इस्रायलने स्पष्टपणे सांगितले आहे की, पुढील आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये लेबनानच्या अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या चर्चेत हा मुद्दा घेतला जाणार नाही आणि हल्ले सुरूच राहतील. त्यामुळे आता हे युद्ध पुन्हा एकदा पेटले आहे.

इस्रायली सैन्याचे लेबनानवर हल्ले

समोर आलेल्या माहितीनुसार, इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनानमधील अनेक भागांवर आज पुन्हा हल्ले केले आहेत. इस्रायल-लेबनान सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले होत आहेत. हे हल्ले सुरु असताना मार्काबा-बानी हय्यान भागात मोठा स्फोट झाला, तर शेबा गावाच्या बाहेरील भागात एका घरावरही भीषण हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर बिंत जुबैल आणि शकरा या गावांवरही हवाई हल्ले करण्यात आले. जफ्ता शहरातील इमारतींवर ही हल्ले झाले आहेत. यामुळे देशातील अनेकत भागात जाळ अन् धूर दिसून येत आहे. यात इस्रायल कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही हे स्पष्ट होत आहे.

इस्रायलच्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी बिघडणार?

काही दिसवांपूर्वी अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली होती. मात्र त्यानंतर काही तासांतच बेरूतमधील गजबजलेल्या व्यापारी आणि निवासी भागांवर इस्रायलने अचानक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 200 च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला होता. हा इस्रायल-हिज्बुल्ला संघर्षातील सर्वात वाईट दिवस होता. या युद्धावर बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, लेबनान हा या युद्धविराम कराराचा भाग नाही, कारण तिथे इराण समर्थित हिज्बुल्ला सक्रिय आहे. दरम्यान, इराणचे असे म्हणणे आहे की, युद्धविराम लेबनानलाही लागू व्हायला हवा. त्यामुळे आता करारात नेमकं काय ठरतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

इस्रायल हल्ले थांबवणार नाही

इस्रायली सैन्याने सांगितले की, 10 मिनिटांच्या आत बेरूत, दक्षिण लेबनान आणि बेका खोऱ्यात हिज्बुल्लाच्या 100 हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले. दरम्यान या हल्ल्यांमुळे इराणने पुन्हा होर्मुज सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांची वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे तणाव वाढला आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग