WPL 2026 उद्घाटन सामना पाहण्यासाठी 750 शिक्षकांनी लावली हजेरी
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं चौथं पर्व सुरु झालं आहे. पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघात होत आहे. या सामना 750 शिक्षकांसाठी पर्वणी ठरला आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ (रजि.) आणि मंडळाचे प्रमुख डॉ. विशाल कडणे यांच्या पुढाकाराने खरेदी केलेल्या तिकिटामधून, मुंबईतील क्रिकेटप्रेमी शिक्षकांसाठी वुमन्स प्रीमियर लीग 2026 मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी या बहुचर्चित उद्घाटन सामन्याची मोफत तिकिटे देण्यासाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून निवड झालेल्या 750 क्रीडा प्रेमी शिक्षकांना सदर सामन्यास मोफत उपस्थिती लावण्याचे भाग्य प्राप्त झाले. या उपक्रमास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमितजी साटम यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षकांसाठी हा अनोखा क्रीडा अनुभव साकारता आला.
लकी ड्रॉचा निकाल 5 जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. निवड झालेल्या 750 भाग्यवान शिक्षकांना कळविण्यात आले आणि त्यांनी या सामन्याला हजेरी लावली. या 57 व्या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक किरण शेलार व आचार्य पवन त्रिपाठी यांनीही शिक्षकांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले. विजेत्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, मंडळाच्या वतीने अशा प्रेरणादायी उपक्रमांची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने
नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी कर्णधार स्मृती म्हणाली की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. या मैदानावर दव खूप मोठी भूमिका बजावते, विशेषतः दुसऱ्या सत्रात, आणि हे असे मैदान आहे जिथे परिस्थिती लवकर बदलू शकते. आम्हाला सुरुवातीलाच कडक गोलंदाजी करायची आहे आणि विरोधी संघांना रोखायचे आहे.’
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘नंतर दवा पडल्याचा विचार करून आम्हीही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. पण हा हंगामातील पहिला सामना आहे. त्यामुळे परिस्थिती कशी होते ते पाहू. खूप चांगले झाले. दुर्दैवाने, हिली मॅथ्यूज आज खेळत नाही कारण ती आजारी आहे. आम्ही गेल्या 10 दिवसांपासून सराव करत आहोत आणि सर्वजण चांगल्या स्थितीत दिसत आहेत. आमचा संघ संतुलित आहे, गेल्या तीन हंगामात आमच्याकडे असलेल्या कामगिरीसारखाच आहे, त्यामुळे आम्हाला खेळात प्रवेश करण्याचा आत्मविश्वास आहे.’
