Maharashtra Election News LIVE : अमरावती : भाजप आणि रवी राणांच्या स्वाभिमानची युती तुटली
BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. प्रचाराला अवघे तीन दिवस शिल्लक असताना स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात 451 पैकी 53 उमेदवार कोट्यधीश असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रातून स्पष्ट झाले आहे. कोट्यधीश असलेले बहुतांश उमेदवार भाजपशी संबंधित असून, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष 13 उमेदवारांकडे एकही रुपये नसल्याची नोंद शपथपत्रात करण्यात आली आहे. जळगावात विना परवानगी बॅनर लावणाऱ्या अपक्ष उमेदवाराविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. सुनील ज्ञानेश्वर पाटील असे अपक्ष उमेदवाराचे नाव असून त्यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाग 11 मधील शिंदेंच्या सेनेचे उमेदवार सिंधू कोल्हे यांनी जीपीएस फोटोंसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. नाशिक मध्ये आज उमेदवारांसाठी स्टार प्रचारक मैदानात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिकमध्ये जाहीर सभा होईल. संध्याकाळी सहा वाजता अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर देखील वंचितच्या उमेदवारांसाठी रॅली काढणार आहेत.यासह देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, मनोरंजन, क्रीडा क्षेत्राताली महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
अमरावती : भाजप आणि रवी राणांच्या स्वाभिमानची युती तुटली
अमरावतीत भाजप आणि रवी राणांच्या स्वाभिमानची युती तुटली आहे. भाजपने ज्या ठिकाणी युवा स्वाभिमानला सहा जागा सोडल्या होत्या त्या ठिकाणी आता भाजपने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊन बळ दिलं आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी ही माहिती दिली आहे.
-
प्रत्येक बचत गटाला 1 लाख रुपये देणार – बावनकुळे
अमरावतीतील प्रचारसभेत बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘जिथे काँगेसचे सरकार तिथे लाडकी बहीण योजना बंद झाली. महिलांनी बचत गट तयार करा प्रत्येक गटाला 1 लाख रुपये देण्याचा आमच्या सरकारने निर्णय केला आहे. सर्व घराचे सर्वेक्षण केले जाईल, अमरावती शहरात CCTV कॅमेरे लावू, 110 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कोणी लाडक्या बहिणी कडे वाकड्या नजरेने पाहत असेल तर सीसीटीव्ही त्यावर लक्ष ठेवणार आहे.’
-
-
ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली – प्रफुल्ल पटेल
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्या काळातील वैभव आता राहिलेले नाही. राज ठाकरेंना गेल्या चार पाच वेळा त्यांना किती मते मिळाली ते पाहा. आज पायाखालची वाळू सरकून राहिलेली आहे म्हणून दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत. मी सांगतो, मुंबईत जरी महायुती म्हणून लढत नाही आहोत तरी मुंबईत देखील महायुतीचीच सत्ता येणार आहे.
-
भाजपाने राज्यातलं राजकारण नासवून टाकलंय-बाळासाहेब थोरात.
भाजपाने राज्यातलं राजकारण नासवून टाकलंय, अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसेच राजकारणाचा बट्टयाबोळ कोणी केला आहे, कशा पद्धतीच्या तडजोडी सुरू आहेत, जनतेने विचारलं पाहिजे आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीचा गोंधळ पाहायला मिळतोय त्यामुळे निवडणूक कोणत्या पातळीवर गेली आहे, असे विधान देखील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे, सांगलीमध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेच्या निमित्ताने ते बोलत होते.
-
राज ठाकरे मुंबईतील ताडदेव शाखेत दाखल
राज ठाकरे मुंबईतील ताडदेव मनसे शाखेत दाखल
मनसे उमेदवार उमेदवार मुकेश भालेराव यांच्या मनसे शाखेत दाखल
मुंबई महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची मुंबईतील विविध शाखांना भेट
शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे विविध शाखांना देत आहेत भेटी
-
-
राज ठाकरे ताडदेव मनसे शाखेत दाखल
राज ठाकरे मुंबईतील ताडदेव मनसे शाखेत दाखल झाले आहे. मनसे उमेदवार उमेदवार मुकेश भालेराव यांच्या मनसे शाखेला त्यांनी भेट दिली आहे. मुंबई महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मुंबईतील विविध शाखांना भेटी सुरु आहे.
-
सुनील राऊत आमदार झाले नसते – सुवर्णा करंजे
कांजूर हा मतदार संघ सुनील राऊत यांचा नाही तर शिवसैनिकांचा आहे.आपण इथे गेल्या १५ वर्षांपासून नगरसेविका आहोत, मागच्या वेळी थोडक्यात आमची संधी हूकली, नाहीतर सुनील राऊत आमदार झाले नसते असे वक्तव्य शिवसेना नेत्या सुवर्णा करंजे यांनी केले आहे.
-
भाजपाने राज्यातले राजकारण नासवून टाकले – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
भाजपाने राज्यातले राजकारण नासवून टाकले आहे. राजकारणाचा बट्टयाबोळ केला असून कशा पद्धतीच्या तडजोडी सुरू आहेत,याचा विचार जनतेने केला पाहिजे आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणूक कोणत्या पातळीवर गेली आहे,असे वक्तव्य काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
-
छत्रपती संभाजीनगरात राजकीय प्रचाराचा धुरळा, आज आणि उद्या विविध नेत्यांचा सभा
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार सभांमुळे राजकीय वातावरण तापणार आहे.आज शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. उद्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टीव्ही सेंटर परिसरात जाहीर सभा घेणार आहेत.याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची रॅली होत आहे.तर मंत्री नितेश राणे यांच्याही तीन सभा होत आहे.
-
उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार
उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये आज तोफ धडाडणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरे शिवसेनेचे 97 उमेदवार हे छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीच्या रिंगणार आहेत.
-
मोदी सरकारला नडलेल्या डॉक्टर संग्राम पाटील यांची सुटका
मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारला नडलेल्या डॉक्टर संग्राम पाटील यांची सुटका करण्यात आली आहे. मुंबई क्राइम ब्रांच यूनिट 3 कडून संग्राम पाटील यांना ताब्यात घेतलं होतं. संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत येताच एअरपोर्टवरून ताब्यात घेण्यात आलं होतं. भाजपच्या जेष्ठ नेत्यांविरोधात आक्षेपार्ह लिखान केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
-
चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर आक्षेप, नक्की काय?
चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर आक्षेप घेतला आहे. पुण्यात सर्वांसाठी मेट्रो आणि पीएमपीएल बस प्रवास मोफत मिळणार या घोषणेआधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या घोषणांवर हा आक्षेप घेतला आहे.
-
एकनाथ शिंदेंकडून अमोल खाडे यांना राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी अमोल खाडे यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं आहे. कुर्लाचे आमदार मंगेश कुडाळकर हे चुनाभट्टी इथे शिवसेना बंडखोर उमेदवार अमोल खाडे यांना घेऊन पोहोचले. यावेळेस अमोल खाडे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि ऊमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळेस एकनाथ शिंदे यांनी खाडेंची पाठ थोपटत तुझं पुनर्वसन करू असं आश्वासन दिलं.
-
बदलापूर नगरपालिकेमधील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी अखेर राजीनामा
बदलापूर : बदलापूर नगरपालिकेमधील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर मनसेकडून फटाके आनंद व्यक्त करण्यात आला.
-
जिथे काँगेसचे सरकार तिथे लाडकी बहीण योजना बंद झाली- चंद्रशेखऱ बावनकुळे
भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीत सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जिथे काँगेसचे सरकार तिथे लाडकी बहीण योजना बंद झाली. महिलांनी बचत गट तयार करा. प्रत्येक गटाला 1 लाख रुपये देण्याचा आमच्या सरकारने निर्णय केला आहे. सर्व घराचे सर्वेक्षण केले जाईल. अमरावती शहरात CCTV कॅमेरे लावू, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.
-
जालन्यात विकासकामांच्या चॅलेंजवरून आजी-माजी खासदारांमध्ये पुन्हा एकदा जुंपली
जालना : विकास कामांच्या चॅलेंजवरून आजी-माजी खासदारांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. पुढच्या एक वर्षात तुम्ही जालना जिल्ह्यासाठी काय देणार आहात आणि मी काय करणार हे सांगतो. माझ्यावर जबाबदारी टाका असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी चॅलेंज दिले. तर मी ज्या दिवशी पुन्हा 2 आमदारांचा बाप होईल तेव्हा त्यांच्यासमोर उत्तर द्यायला उभं राहील असे खासदार कल्याण काळे म्हणाले.
-
बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार
बीड : ट्युशनला जात असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यात उघडकीस आली आहे. नेहमीप्रमाणे ट्युशनसाठी निघालेल्या पंधरा वर्षाच्या मुलीला ओळखीच्या तरुणाने कारमधून फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिला तालुक्याबाहेरील डोंगराळ आणि निर्जन भागात नेलं. यानंतर तिथे एकांताचा फायदा घेत मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर घडलेल्या घटनेची माहिती पीडित मुलीने घरी जाऊन पालकांना सांगितले. यानंतर पालकांनी पोलिसात तत्काळ तक्रार देत गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास केज पोलिसांकडून केला जात आहे. -
व्यापारी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित
पुण्यातील प्रभाग क्रमांक २०,२१ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ व्यापारी मेळावा भरवण्यात आला. या कार्यक्रम सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असल्याचे पहायला मिळाले.
-
पोरं तुम्ही पैदा करायचे आणि बारसं आम्ही करायचं- गुलाबराव पाटील
दमदम मे दम नही खैर करो जान की, पडदा उठा के देखो तलवार खडी है शिवसेने की. लोकांना वाटलं एकनाथ शिंदे येत नाही गुलाबराव पाटील येत नाही. मात्र एकनाथ शिंदे यांना पण दाढी आणि गुलाबराव पाटलांना पण दाढी आहे. ते जरी आले नाही तर त्यांचा पट्टा अहिल्यानगरकरांना जागा करायला आला आहे. माझ राष्ट्रवादी वाल्यांना चॅलेंज आहे अहिल्यानगरची पाणीपुरवठा योजना कोणी मंजूर केली तर या पठ्याने मंजूर केली. पोरं तुम्ही पैदा करायचे आणि बारसं आम्ही करायचं हा धंदा आमचा नाही असे गुलाबराव पाटील म्हणाले.
-
भाजपमध्ये मेरिट बदलले आहे, बलात्कार , चोरी, मर्डर करणाऱ्यांना उमेदवारी-एकनाथ खडसे
बलात्कार करणाऱ्या कार्यकर्त्याला देखील भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतले जात, ही भाजपची बदलती संस्कृती आहे. आता भाजपमध्ये मेरिट बदलले आहे, बलात्कार , चोरी, मर्डर असे जास्तीत जास्त गुन्हे केलेल्यांना उमेदवारी देण्याची प्रथा भाजपमध्ये सुरू झालेली दिसतेय असे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
-
सांगलीत महाविकास आघाडीकडून काळया फिती लावून प्रचार
सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी काळ्या फिती लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान सत्ताधारी भाजपाकडून दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप करत, सांगलीवाडी येथील महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून काळ्या फिती लावून प्रचार करण्यात येत आहे.
-
अमरावतीत अजित पवारांच्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांचा पलटवार
काल उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावती दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं, इथे कोणी दादागिरी, गुंडगिरी,दहशत करत असेल तर ती गुंडगिरी मोडीत काढू असा इशारा त्यांनी दिला होता, दरम्यान त्यानंतर आता अजित पवार यांच्या विधानावर यशोमती ठाकूर यांनी जोरदार पलटवार केला आहे. खऱ्या अर्थाने अमरावतीतील गुंडागिरी थांबवायची असेल तर तुम्ही सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे, अजितदादा सत्तेचा उपयोग घेता आणि बाहेर असं दाखवतात की ते भाजपच्या विरोधात आहेत, असं यावेळी ठाकूर यांनी म्हटलं.
-
सोलापुरातून मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
सोलापुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली, या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोलापूरकरांना सांगितले होते बंद पाईपलाईनने पाणी देऊ, पण उद्धव ठाकरेंचे सरकार आले आणि कामाचा सत्यानाश झाला. पण आम्ही पुन्हा सत्तेत आलो आणि काम पूर्ण केले. यापुढे जाऊन आम्ही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 892 कोटीची योजना आणली, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
-
नाशिकमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा
नाशिक मध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन
शिवसेना – राष्ट्रवादी युवतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
सभेच्या तयारीचा मंत्री दादा भुसे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून आढावा
राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रितरित्या केली पाहणी
-
आम्ही हिंदू मुस्लिम असं कधी केलं नाही-उद्धव ठाकरे
मी आणखी एक लाख रुपये देतो. त्यांनी आम्ही केलेल्या कामासारखं कामे दाखवावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. आम्ही कोरोनाच्या काळात जे काम केलं त्याचं जगाने कौतुक केलं. हे सुरु असताना गंगेत प्रेतं वाहत होती. ती हिंदूची होती की मुस्लिमांची हे फडणवीस यांनी सांगावं. तसेच गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटत होत्या. त्या हिंदू कि मुस्लिमांच्या होत्या हे फडणवीस यांनी सांगावं. आम्ही हिंदू मुस्लिम केलं नाही. सर्वांना पाहिलं. भेदभाव केला नाही, असे ठाकरे म्हणाले.
-
त्यांनी भाषणात २२ हजार कोटी खाल्ले-उद्धव ठाकरे
फडणवीस रेकतात कशाला. यांनी ७० हजार कोटींच्या ठेवी तोडल्या. यांनी भयानक माहिती दिली. ७० हजार कोटी गेले कुठे. २२ हजार कोटी खाल्ले की. कुणाच्या खिशात गेले. हे भयानक आहे. हा गौप्यस्फोट आहे. यांनी २२ हजार कोटी यांनी भाषणातच खाल्ल्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला. गणेश नाईक म्हणतात नवी मुंबई कर्जबारी केली. ठेवी तोडल्या. त्यांना सांगा ना ठेवी काय चाटायच्या आहेत का. नवी मुंबईत एफएसआयचा घोटाळा ज्यांनी केला त्याला शिक्षा देणार आहेत का. आणखी मला कळलं की १७ हजार कोटी लाटणार आहेत, अशी टीका ठाकरे यांनी केली.
-
मुंबईला तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे-उद्धव ठाकरे
आम्ही तेव्हा त्यांच्यासोबत होतो. तेव्हा मुंबईला तोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला नव्हता. आता दोन तीन वर्षात हे जाणवत आहे. मुंबईकरांवर बिल्डरची दादागिरी सुरू आहे. वेज नॉनव्हेज करत आहेत. या बिल्डरांना हाकलून द्या. कोण आहेत ते. आमच्यात मिठाचा खडा टाकणारे हो लोक आहे. तो भैय्या जोशी आला. काय संबंध तुमचा. कोण ओळखतं तुम्हाला. हिंदीची सक्ती. का करता सक्ती असा सवाल उद्धव ठाकरे म्हणाले.
-
आम्ही लढ्यात पुढे असणारे लोक -उद्धव ठाकरे
बाळासाहेबा ठाकरे एकमेव ब्रँड होता. त्या आधी प्रबोधनकार ब्रँड होते. आमच्या घरात परंपरा आहे. यांना आगा पिच्छा नाही. यांना बापचं नाव लावता येत नाही. यांच्या बापाचं नाव काय. आमची परंपरा आहे. आम्ही लढ्यात पुढे असणारे लोक आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी टीव्ही ९ मराठीच्या खास मुलाखतीत सांगितले.
-
आता मोदींची गॅरंटी चालत नाही-उद्धव ठाकरे
सगळीकडे विनाश ही त्यांची टॅग लाईन आहे. गणेश नाईक बोलत आहेत. संजय केळकर बोलत आहेत. एक लाख रुपयांचं भाजपला चॅलेंज देतो. मुंबईचा महापौर कोण होणार, सुरुवात कोणी केली. आम्ही तर खान महापौर होणार असं म्हटलं नाही. यांचं एक भाषण दाखवा की हिंदू मुस्लिम केलं नाही. लोकांची घरे जाळून पोळ्या शेकणारे हे नालायक लोक आहे. ठाकरेंचा शब्द आहे. आता मोदींची गॅरंटी चालत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
-
कटेंगे तो बटेंगेंवर उद्धव ठाकरेंचे मोठे भाष्य
मोदींचं एक भाषण दाखवा हिंदू मुस्लिम वादावर झालं नाही. कटेंगे तो बटेंगे काय आहे. मंगळसूत्र चोरलं जाईल हे काय आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. यांची भाषणं ही हिंदू मुस्लिमचीच आहे. हे लढणारे नाही. हे हातपाय गाळणारे आहेत. यांना सर्व फुकटात दिलं. यांचे नगरसेवक २०-२५ असायचे. सर्व जाहिराती करायचे. त्यावेळी आमच्या ताटात जेवायचे. आम्ही होर्डिंग केली करून दाखवलं. २०१७लाही करून दाखवलं. आताही होर्डिंग लागलंय होय आम्ही हे करून दाखवलं , असे ठाकरे म्हणाले.
-
कोस्टल रोड हा विकास नाही का? उद्धव ठाकरे
कोस्टल रोड हा विकास नाही का. शाळांचा सुधारणा हा विकास नाही का. झोपडपट्टी धारकांना चांगली घरे देणं हा विकास नाही का. वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली, हॉस्पिटल स्थापन केली हा विकास नाही का. किती तरी विकासाची कामे केली. महापालिका त्यासाठीच असते. हिंदू मुस्लिम झगडे लावण्यासाठी नसते. नगर पालिकेची निवडणूक असेल तर नशीब हे शाळेत नाही. नाही तर शाळेतील मॉनिटरच्या निवडणुकीत हिंदू मुस्लिम केलं असतं. एक निवडणूक नाही की त्यांनी हिंदू मुस्लिम केलं नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
-
त्यांचा फक्त मुंबईतील एफएसआयशी संबंध – उद्धव ठाकरे
मोहन भागवत म्हणाले अपत्य वाढवा. यांना राजकारणात अपत्य होत नाही. आम्ही मुंबईचा कचरा गोळा करतो. हे इतर कचरा गोळा करतात. फडणवीसांचा मुंबईशी संबंध काय. त्यांचा फक्त मुंबईतील एफएसआयशी संबंध आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
-
७० हजार कोटी गेले कुठे? उद्ध
“फडणवीस रेकतात कशाला. यांनी ७० हजार कोटींच्या ठेवी तोडल्या. यांनी भयानक माहिती दिली. ७० हजार कोटी गेले कुठे? २२ हजार कोटी खाल्ले की. कुणाच्या खिशात गेले. हे भयानक आहे. हा गौप्यस्फोट आहे. यांनी २२ हजार कोटी यांनी भाषणातच खाल्ले” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
अक्षय शिंदे जिवंत असता तर तुषार आपटे तुरुंगात गेला असता, उद्धव ठाकरे
अक्षय शिंदे जिवंत असता तर तुषार आपटे तुरुंगात गेला असता. सत्तेसाठी आम्ही तर असं काही करत नाही ना. सत्तेसाठी हे विकृतीला स्वीकृती देतायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
-
निवडणूक लढायला घाबरता का तुम्ही? उद्धव ठाकरे
“निवडणूक लढायला घाबरता का तुम्ही? तुमच्या मनात भिती आहे. बिनविरोध मी पण निवडून आलो. माझेच आमदार होते” असं उद्धव ठाकरे बिनविरोध उमेदवार निवडीच्या उमेदवारावर बोलले. त्यांची टीव्ही 9 मराठीवर मुलाखत सुरु आहे.
-
मनसेकडून बदलापूरमध्ये महामोर्चाचा इशारा
“भाजप पक्ष स्वतःला पांढरपेशा पक्ष समजत आहे. असा पक्ष अशा विकृत लोकांना नगरसेवक करत पक्षात घेत आहे. या पक्षाची मानसिकता कळते. बदलापूर मध्ये रेल्वे आंदोलनावेळी हजारो लोक रस्त्यावरती उतरले. मनसेकडून अशा व्यक्तीचा निषेध. भाजप पक्षाला विनंती ताबडतोब त्याला पदावरून हटवा. पुढची गाठ मनसेशी आहे. आपट्याच्या बाबत निर्णय बदलला गेला नाही, तर बदलापूर मध्ये महामोर्चा काढला जाणार” असं मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.
-
गोंदिया शहरात गुन्हेगारीला लगाम….
2025 मध्ये हत्या व शस्त्रजप्तीत पोलिसांना मोठे यश आलं आहे. 17 तलवारी व चाकू, तसेच दोन देशी पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. कठोर कारवाईचा परिणाम दिसून येत आहे. गोंदिया शहरात 2025 मध्ये गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली आहे.
-
शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रचारासाठी कालीचरण महाराज मैदानात
नाशिकच्या प्रभाग २० मध्ये कालीचरण महाराजांचा रोड शो सुरु झाला आहे. प्रभाग २० हा भाजपचा बालेकिल्ला असल्यानं रोड शो चर्चेत आला आहे. प्रभाग २० मध्ये भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. प्रखर हिंदुत्ववादी कालीचरण महाराज काय बोलतात याकडं लक्ष लागलं आहे.
-
बीडच्या गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल
संत वामनभाऊ महाराज यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्ण महोत्सवाची आज सांगता होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरवर्षी गडावर येत असतात. त्यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित झाल्या आहेत.
-
अमरावती महानगरपालिका निवडणुकीयत भाजप नंतर आता शिंदेच्या शिवसेनेकडून ही हिंदुत्वाचे कार्ड..??
अमरावती महानगरपालिका निवडणुकीयत भाजप नंतर आता शिंदेच्या शिवसेनेकडून ही हिंदुत्वाचे कार्ड..? अमरावतीच्या प्रगतीचा भगवा पर्व..लाडक्या बहिणीचा मान आपला धनुष्यबाण अशा आशयाचे शहरात मोठे होर्डिंग्ज लागले आहेत. भाजप नंतर अमरावतीत शिवसेनेचे मोठे होर्डिंग्ज…शिवसेनेचे अनेक नेते प्रचारासाठी अमरावतीमध्ये येणार आहेत. तीन दिवसांपूर्वीच अमरावतीत उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली.
-
भाजप जिल्हाध्यक्षांचे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर
खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या जाहीरनाम्यात “मी सोलापुरात थांबणार” असे आश्वासन द्यावे. खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपच्या जाहीरनाम्याला कॉपी पेस्ट जाहीरनामा” अशी टीका केली होती. त्यावर भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. इतकी वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती मात्र त्यांनी विकास केला नाही त्यामुळे विकास प्रणिती शिंदे यांना कळणार नाही. विकासपुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत.
-
15 लाखांची रोकड घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलंय
पिंपरी शहरातील पिंपळे सौदागर भागात असलेल्या कुंजीर चौकात ही कारवाई केल्या गेली. -योगेश जाधव अस या तरुणाच नाव असल्याची माहिती समोर आलीय. निवडणूक आयोगाचे अधिकारी यांनी देखील या कारवाईत सहभाग होता विशेष म्हणजे या तरुणाकडे आढळून आलेल्या या रोख रकमेत भारतीय चलनासह विदेशी चलनाचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय
-
या आरोपींना भाजपाने बक्षिस दिले का? -संजय राऊत
बदलापूप लैगिंक अत्याचार प्रकरणातील आरोपींनी भाजपाने बक्षिस दिले का? हा मोठा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अत्याचार प्रकरणानंतर शाळेचे संचालक फरार झाले होते, असेही राऊतांनी म्हटले.
-
अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आश्वर्य वाटण्यासारखे काही नाही- संजय राऊत
अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले आहेत तर त्यामध्ये आर्श्चय वाटण्यासारखे काहीच नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगताना संजय राऊत हे दिसले.
-
दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात पुणेकरांसाठी 5 महत्वाच्या गोष्टी.
दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात पुणेकरांसाठी 5 महत्वाच्या गोष्टी. शाळा, पाणी आणि प्रदूषण कमी करण्यावर भर. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रसिद्ध केला जाहीरनामा.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सोलापूरमध्ये सभा
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आज दौऱ्यावर असून त्यांची जाहीर सभा होणार आहे. दुपारी एक वाजता हरी बाई देवकरण प्रशालेच्या मैदानात मुख्यमंत्री फडणवीस सभेच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणार असून ते सोलापूरच्या विकासाचे कोणते मुद्दे मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
-
पुणे – शिरूर शहरात विद्याधाम शाळेच्या बाहेर शाळकरी मुलांची तुंबळ हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
शिरूर/पुणे – शिरूर शहरातील विद्याधाम शाळेच्या बाहेर BJ कॉर्नर चौकात शाळकरी मुलांची तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल व्हायरल होत आहे. शहरातील गजबजलेल्या BJ कॉर्नर चौकात शाळेच्या गणवेशातील विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. विद्यार्थी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा मारा करत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
-
भाजप स्वीकृत नव्हे विकृत नगरसेवक – किशोरी पेडणेकरांची टीका
भाजप स्वीकृत नव्हे विकृत नगरसेवक अशा शब्दांत किशोरी पेडणकेरांनी टीकास्त्र सोडलं आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना भाजपने स्वीकृत नगरसेवक केल्याने मोठा वाद पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर पेडणेकर यांनी जोरदार टीका करत याविरोधात स्थानिक नागरिकांनीही आवाज उठवावा अशी मागणी केली आहे.
-
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस ॲक्शन मोडवर, नायलॉन मांजा विकणाऱ्या दोघांना अटक
जळगावात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर असून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन जणांना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्याकडून मांजाचे 20 हजार रुपये किंमतीचे 25 रीळ जप्त करण्यात आलं असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलीस करडी नजर ठेवणार आहेत.
-
पुणे – अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन
पुणे – अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. नळाद्वारे नियमित पाणी, प्रदुषणमुक्त पुणे यांसह 5 कामांचा वाद करण्यात आला आहे.
-
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदा सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्वाचे नेते उपस्थित आहेत.
-
मुंबई – शिवतीर्थावर उद्या ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार
मुंबईत उद्या शिवतीर्थावर राज व उद्धव या ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे. शिवाजी महाराज पार्क येथे उद्या दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होणार असून सर्वांचं त्याकडे लक्ष लागलं आहे.
Published On - Jan 10,2026 9:04 AM
