AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RCB : मुंबईला पहिल्याच सामन्यात झटका, स्टार खेळाडू आऊट, आरसीबीची बॅटिंग की बॉलिंग? पाहा प्लेइंग ईलेव्हन

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Women Toss : मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात मोठा झटका लागला आहे.मुंबईची प्रमुख खेळाडू हॅली मॅथ्यूज हीला पहिल्या सामन्याला मुकावं लागलं आहे. तिच्या जागी युवा खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.

MI vs RCB : मुंबईला पहिल्याच सामन्यात झटका, स्टार खेळाडू आऊट, आरसीबीची बॅटिंग की बॉलिंग? पाहा प्लेइंग ईलेव्हन
RCB vs MI Wpl Toss Smriti Mandhana and Harmanpreet KaurImage Credit source: @wplt20 x account
| Updated on: Jan 09, 2026 | 7:53 PM
Share

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमाला (WPL 2026) दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Mumbai Indians Women vs Royal Challengers Bengaluru) आमनेसामने आहेत. मोसमातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी टॉस झाला. पहिल्याच सामन्यात मुंबईच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला. आरसीबी कर्णधार स्मृती मंधाना हीने टॉस जिंकला आहे. स्मृतीने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. तर मुंबईला या सामन्याआधीच तगडा झटका लागला आहे.

मुंबईला मोठा झटका

मुंबईला पहिल्या सामन्याआधीच मोठा झटका लागला आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात प्रमुख खेळाडूशिवाय उतरावं लागणार आहे. मुंबई पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज हीच्याशिवाय मैदानात उतरणार आहे. हेलीची तब्येत ठीक नसल्याने ती निवडीसाठी उपलब्ध नव्हती, अशी माहिती कर्णधार हरमनप्रीत कौर हीने टॉसनंतर दिली. हेलीच्या जागी निकोला केरी हीचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.निकोलाचं यासह डब्ल्यूपीएल स्पर्धेत पदार्पण झालं आहे. त्यामुळे निकोला पदार्पणात  कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कॅप्टन हरमनप्रीतच्या कामगिरीकडे लक्ष

क्रिकेट चाहत्यांचं या सामन्यात हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या कर्णधार-फलंदाज जोडीकडे बारीक लक्ष असणार आहे. या दोघी नेतृत्वाच्या जबाबदारीसह फलंदाज म्हणून कशी कामगिरी करतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भारताने डब्ल्यूपीएलआधी झालेल्या शेवटच्या टी 20I मालिकेत श्रीलंकेचा 5-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला होता. त्यामुळे टी 20Iनंतर डब्ल्यूपीएलमध्ये दोघींपैकी कोण सातत्य राखण्यात यशस्वी ठरतं हे लवकरच स्पष्ट होईल.

मुंबई-आरसीबी पहिल्या सामन्यासाठी सज्ज

वूमन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना (कर्णधार), ग्रेस हॅरिस, दयालन हेमलता, ऋचा घोष (विकेटकीपर), राधा यादव, नादिन डी क्लर्क, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, प्रेमा रावत, लिन्से स्मिथ आणि लॉरेन बेल.

वूमन्स मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रंट, जी कमलिनी (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, निकोला केरी, पूनम खेमनार, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता, सजीवन सजना आणि सायका इशाक.

सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.