AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“World Cup 2023 साठी ‘या’ दोन खेळाडूंची निवड न करणं म्हणजे सर्वात मोठा झटका”

World Cup 2023 | टीम इंडियामध्ये आता काही प्रयोग केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ही सर्व तयारी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे, अशातच एका माजी खेळाडूने दोन खेळाडूंच्या निवडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

World Cup 2023 साठी 'या' दोन खेळाडूंची निवड न करणं म्हणजे सर्वात मोठा झटका
Rohit sharma-Rahul Dravid
| Updated on: Aug 02, 2023 | 1:19 PM
Share

मुंबई : यंदा वन डे वर्ल्ड कप 2023  भारतामध्ये होणार असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप थराराला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कपला काही दिवस बाकी असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. टीम इंडियामध्ये आता काही प्रयोग केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ही सर्व तयारी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे, अशातच एका माजी खेळाडूने दोन खेळाडूंच्या निवडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

कोण आहेत ते दोन खेळाडू?

बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौरा सुरू असताना आयर्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या मालिकेमध्ये जसप्रीत बुमराहकडे संघाच्या कर्णधारडपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसं पाहायला गेलं तर या मालिकेमध्ये जसप्रीत बुमराह वगळता सर्व युवा खेळाडू आहेत. यातील कित्येक खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना दिसतील. माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा याने दोन खेळाडूंची या मालिकेमध्ये निवड न झाल्याने टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आकाश चोप्राने आपल्या यू-ट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्यात आलं आहे. पण के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोन खेळाडूंची नाव का नाहीत. राहुल आणि अय्यरच्या फिटनेसबाबत अजून काही प्रश्न आहेत का? असा सवालही त्याने उपस्थित केला. जसप्रीत बुमराह 24 कॅरेट सोनं आहे मात्र अनेकवेळा त्याने कमबॅक केलं आणि परत दुखापतीमुळे बाहेर झाला.

राहुल आणि अय्यर यांच्याबाबत बोलताना, दोघांची संघात नावं नाहीत म्हणजे ते आशिया कपची तयारी करू शकणार नाहीत का? जर दोघेही वर्ल्ड कप खेळू शकणार नसतील तर वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात असल्याचं आकाश चोप्रा म्हणाला.

दरम्यान, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध असणार आहे. यजमानपद भारताकडे असल्याने त्याचा टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे.

राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.