एरॉन फिंच नंतर ऑस्ट्रेलियाचा पुढचा कॅप्टन कोण? ‘हा’ खेळाडू आहे प्रमुख दावेदार

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एरॉन फिंचने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रविवारी वनडे फॉर्मेटमध्ये तो आपला शेवटचा सामना खेळेल. न्यूझीलंड विरुद्ध तो हा सामना खेळणार आहे.

एरॉन फिंच नंतर ऑस्ट्रेलियाचा पुढचा कॅप्टन कोण? 'हा' खेळाडू आहे प्रमुख दावेदार
Aaron-FinchImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 3:18 PM

मुंबई: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एरॉन फिंचने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रविवारी वनडे फॉर्मेटमध्ये तो आपला शेवटचा सामना खेळेल. न्यूझीलंड विरुद्ध तो हा सामना खेळणार आहे. एरॉन फिंच टी 20 क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार असून तो या फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियाच नेतृत्व करणार आहे. वनडे क्रिकेटमध्ये एरॉन फिंचची जागा कोण घेणार? ते अजून स्पष्ट नाहीय. फिंच नंतर हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू वनडेमध्ये संघाच नेतृत्व संभाळू शकतात.

टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी

कॅप्टनशिपच्या जबाबदारीसाठी सध्या पॅट कमिन्सच नाव आघाडीवर आहे. कमिन्स सध्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कॅप्टन आहे. टीमचा कॅप्टन बनण्यासाठी तो प्रबळ दावेदार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वनडेसाठी सुद्धा पॅट कमिन्सच नाव आघाडीवर आहे.

तो सुद्धा एरॉन फिंचची जागा घेऊ शकतो

स्टीव स्मिथ दुसरा पर्याय आहे. तो सुद्धा एरॉन फिंचची जागा घेऊ शकतो. स्मिथ याआधी सुद्धा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता. पण बॉल टॅम्परिंगच्या वादामुळे त्याला कॅप्टनशिपवरुन हवटण्यात आलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर बंदी घातली होती. पण आता अशी कुठलीही बंदी नाहीय. स्मिथ टेस्ट टीमचा उपकर्णधार आहे. तो आपल्या अनुभवाच्या बळावर कॅप्टनशिपची शर्यत जिंकू शकतो.

त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सीरीज जिंकली होती

ग्लेन मॅक्सवेलच नाव सुद्धा कॅप्टनशिपसाठी चर्चेत आहे. तो संघातील अनुभवी खेळाडू आहे. फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये टीमच नेतृत्व करण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. एलेक्स कॅरी सुद्धा एक नाव आहे. जो फिंचच स्थान घेऊ शकतो. फिंचला वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजच्यावेळी दुखापत झाली होती. कमिन्सही नव्हता. त्यावेळी कॅरीने कॅप्टनशिपची जबाबदारी संभाळली होती. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सीरीज जिंकली होती.

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.