AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीच्या शगुन कार्यक्रमात अभिषेक शर्माची धमाल, होणाऱ्या भावोजींना स्टेजवर बोलवून भांगडा; Video Viral

अभिषेक शर्मा बहिणीच्या शगुन कार्यक्रमात वेगळ्याच मूडमध्ये दिसला. बहिणीचं 30 ऑक्टोबरला लग्न होणार आहे. त्याआधी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अभिषेक शर्माने होणाऱ्या भावोजींसोबत भांगडा केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बहिणीच्या शगुन कार्यक्रमात अभिषेक शर्माची धमाल, होणाऱ्या भावोजींना स्टेजवर बोलवून भांगडा; Video Viral
बहिणीच्या शगुन कार्यक्रमात अभिषेक शर्माची धमाल, होणाऱ्या भावोजींना स्टेजवर बोलवून भांगडा; Video ViralImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 01, 2025 | 8:24 PM
Share

अभिषेक शर्माने आशिया कप 2025 स्पर्धा गाजवली. तो मैदानात असेपर्यंत प्रतिस्पर्धी गोलंदाज आणि संघाला धाकधूक असायची. इतकी दहशत अभिषेक शर्माने अल्पावधीच तयार केली आहे. अभिषेक शर्मा आशिया कप स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावून मायदेशी परतला आहे. पण यावेळी त्याचं वेगळं रूप पाहायला मिळालं. कारण आता अभिषेक शर्मा त्याची बहीण कोमलच्या लग्नात व्यस्त झाला आहे. अभिषेक शर्माने क्रिकेट बाजूला ठेवून लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. कोमलच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम 30 सप्टेंबरपासून सुरु झाले आहे. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत अभिषेक शर्मा होणारे भावोजी लविश ओबेरॉय यांच्यासोबत भांगडा करताना दिसला. पंजाबी गायक रणजीत बावासोबत स्टेज शेअर केला. अभिषेक शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 30 सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमातील आहेत.

अभिषेक शर्माच्या बहिणीच्या शगुन कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही हजेरी लावली. अभिषेक शर्मा त्याचा भावी भावोजी, लविश ओबेरॉय यांनी काळ्या रंगातील कपडे परिधान केले होते. काळ्या रंगाच्या लूकमध्ये अभिषेक खूपच डॅशिंग दिसत होता. अभिषेक शर्माला दिलखुलासपणे नाचताना पाहून उपस्थितांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. कोमल आणि लोविस यांचे लग्न अमृतसरमधील गुरुद्वारात शीख विधींनुसार होईल. अभिषेक शर्माला कोमल आणि सानिया या दोन मोठ्या बहिणी आहेत. अभिषेक कुटुंबात सर्वात लहान आहे.

आशिया कपमध्ये टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले. अभिषेकने आशिया कपच्या सात सामन्यांमध्ये 314 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. सात डावांमध्ये 44.85 च्या सरासरीने आणि 200 च्या स्ट्राईक रेटने 314 धावा केल्या. सुपर फोरच्या सर्व सामन्यांमध्ये 50+ धावा केल्या. यात पाकिस्तानविरुद्ध 74 धावांचा डावही समाविष्ट होता. अंतिम सामन्यात अभिषेक शर्माची बॅट हवी तशी चालली नाही. पण त्याच्या नावाची दहशत पाकिस्तानी गोलंदाजांच्या मनात घर करून होती.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.