AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

afg semi final : अफगाणिस्तान संघाने सेमी फायनल गाठली पण एक काळा डाग आयुष्यभरासाठी लावला, जाणून घ्या

agf vs ban : टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान संघाने सेमी फायनलमध्ये जागा मिळवत इतिहास रचला. अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला असला तरी मोठा कलंक त्यांच्या टीमला लागला आहे. नेमका काय तो जाणून घ्या.

afg semi final : अफगाणिस्तान संघाने सेमी फायनल गाठली पण एक काळा डाग आयुष्यभरासाठी लावला, जाणून घ्या
| Updated on: Jun 26, 2024 | 9:24 PM
Share

टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. जगभरातून अफगाणिस्तान संघाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडताना दिसतेय. सुपर-8 फेरीमध्ये अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मोठा उलटफेर केला. त्यानंतर टीम इंडियानेही ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अफगाणिस्तान संघाला संधी उपलब्ध करून दिली. शेवटच्या सामन्यात बांगलादेश संघाचा पराभव केला आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश करत इतिहास रचला. अफगाणिस्तान संघाचा आत्मविश्वास जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हा कारनामा करून दाखवला. पण बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात त्यांनी खेळलेल्या रडीच्या डावामुळे अफगाणिस्तान संघाने डाग लावून घेतला आहे.

अफगाणिस्तान संघासाठी बांगलादेशला पराभूत करण गरजेचं होतं. कारण या विजयामुळे त्यांचं सेमी फायनलचं तिकीट पक्क होणार होतं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 20 ओव्हरमध्ये 115-5 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने 12 ओव्हरमध्ये हे टार्गेट पूर्ण केलं असतं तर त्यांनाही सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी होती. मात्र 105  धावांवर बांगलादेश ऑल आऊट झाला. सामन्यात मोठी रंगत आली होती, दोन्ही संघांवर समसमान दबाव होते.

अफगाणिस्तान संघाचा रडीचा डाव

बांगलादेश आणि अफगाणिस्तान सामन्यात पावसाने अनेकवेळा खोडा घातला होता. पावसामुळे जर सामना रद्द झाला असता तर अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला असता. सामन्याच्या 12 व्या ओव्हरमध्ये कॅप्टन राशिद खान बॉलिंग करत होता, त्यावेळी पावसाने हजेरी लावली अफगाणिस्तान खेळाडूही घाबरले. कारण यावेळी पावसामुळे सामना थांबला असता तर डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्तान संघ दोन धावांनी पुढे होता. यादरम्यान अफगाणिस्तानाचे कोच जोनाथन ट्रॉट यांनी खेळ स्लो करायला लावला. त्यांनी फक्त इशारा दिला आणि हा इशारा अफगाणिस्तान संघाचा खेळाडू  गुलबदिन नायब ओळखला.

राशिद खान बॉल टाकण्यासाठी येणार तितक्यात गडी खाली पडला. कारण त्याने आपल्या कोचचा इशारा समजला होता. सामना लांबला गेला आणि पाऊस आला तर अफगाणिस्तान संघ विजयी ठरणार होता. मात्र खिलाडूवृत्तीला हे कुठेतरी तडा देणारे आहे. इतके चांगले खेळले पण या एका गोष्टीमुळे त्यांच्यावर मजबूत टीका होताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग 11): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.

भारत (प्लेइंग 11): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.