AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians | रोहितच्या जागी आलेल्या Hardik pandya एकदम रॉयल, राजासारख स्वागत, VIDEO बघून व्हाल हैराण

Mumbai Indians | सध्या क्रिकेट विश्वात हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सची चर्चा आहे. कारण मुंबई इंडियन्सने एक बोल्ड निर्णय घेतला. त्यांनी यशस्वी कॅप्टन रोहित शर्माला हटवून त्याच्याजागी हार्दिक पांड्याची निवड केली. हा एक धाडसी निर्णय आहे. पण हार्दिक पांड्याने सुद्धा कॅप्टन म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध केलीय.

Mumbai Indians | रोहितच्या जागी आलेल्या Hardik pandya एकदम रॉयल, राजासारख स्वागत, VIDEO बघून व्हाल हैराण
Hardik pandya Mumbai Indiamns new captainImage Credit source: AFP
| Updated on: Dec 27, 2023 | 12:52 PM
Share

Mumbai Indians | भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एक नाव खूप चर्चेत आहे, ते म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्याची अलीकडेच घरवापसी झालीय. मुंबई इंडियन्सने त्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केलं. पुढच्या सीजनमध्ये हार्दिक आपली जुनी टीम मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केलीय. या दरम्यान पांड्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात गुजरात जामनगरमध्ये हार्दिक पांड्याच दमदार स्वागत करण्यात आलं.

पांड्या 2015 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. मुंबई इंडियन्सकडून हार्दिकने सुरुवात केलेली. 2021 पर्यंत तो मुंबई टीमचा भाग होता. वर्ष 2022 मध्ये मुंबईने त्याला रिटेन केलं नाही. नवीन टीम गुजरातने पांड्याला घेतलं व कॅप्टन बनवलं. पदार्पणातच पांड्याने गुजरातला टायटल जिंकून दिलं. त्यानंतर यावर्षी गुजरात टायटन्सला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं. अंतिम फेरीत चेन्नईने गुजरातचा पराभव केला.

राजासारख वेलकम

हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात तो जामनगरला पोहोचल्याच दिसतय. जामनगरमध्ये एका मोठ्या प्रवेशद्वारावर त्याच जोरदार स्वागत करण्यात आलं. हार्दिक पांड्याच्या स्वागताला दोन्हीबाजूला घोडेस्वार आहेत. तो येताच मोठ्याने पुकार होतो. हार्दिकची गाडी थांबते. त्यावेळी घोड्यावर स्वार असलेल्या व्यक्तीच्या परवानगीनंतर त्याची गाडी आत जाते. त्याच्या गाडीच्या पुढे आणि मागे घोडेस्वार असतात. एखाद्या राजासारख पांड्याच स्वागत झालं. 30 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

टीम इंडियासाठी एक गुड न्यूज

हार्दिक पांड्या वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा भाग होता. पण त्याला दुखापत झाली. त्याला टाचेची दुखापत झाली. त्यानंतर तो वर्ल्ड कपमधून बाहेर गेला. सध्या तो दुखापतीमधून सावरण्यावर मेहनत घेतोय. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, हार्दिक दुखापतीमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर होऊ शकतो. पण टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलय की, हार्दिक आता दुखापतीमधून बरा झालाय. जानेवारीमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामन्याची टी 20 सीरीज होईल. त्यामध्ये तो टीम इंडियाच नेतृत्व करेल.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.