AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yashasvi Jaiswal | तुम्ही खूश आहात ना….व्हिडिओ कॉलवर भरपूर रडला यशस्वी, वडिलांनी सांगितलं, सकाळी 4.30 ला काय झालं?

Yashasvi Jaiswal | मुंबईचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वालने पदार्पणाच्या सामन्यात सर्वांच मन जिंकलं. त्याने कमालीचा खेळ दाखवला. डेब्यु मॅचमध्येच त्याने शतक ठोकलं. आज सर्वत्र त्याचीच चर्चा आहे.

Yashasvi Jaiswal | तुम्ही खूश आहात ना....व्हिडिओ कॉलवर भरपूर रडला यशस्वी, वडिलांनी सांगितलं, सकाळी 4.30 ला काय झालं?
Yashasvi Jaiswal debu test century
| Updated on: Jul 16, 2023 | 12:57 PM
Share

मुंबई | 16 जुलै 2023 : यशस्वी जैस्वालने वयाच्या 21 व्या वर्षी टीम इंडियासाठी डेब्यु केला. डेब्यु मॅचमध्येच तो शतकी इनिंग खेळला. वेस्ट इंडिज विरुद्ध डॉमिनिका टेस्टमध्ये यशस्वीने 171 धावा केल्या. रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी यशस्वीने 229 धावा केल्या. टीम इंडियाने टेस्टच्या तिसऱ्याच दिवशी इनिंग आणि 141 धावांच्या मोठ्या फरकाने ही मॅच जिंकली. या प्रदर्शनानंतर यशस्वीला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.

उत्तर प्रदेशच्या भदोही येथे राहणारा यशस्वी खूप कमी वयात एकटा मुंबईला निघून आला. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

पॉकेटमनीसाठी मुंबईत पाणीपुरी विकली

पॉकेटमनीसाठी मुंबईत पाणीपुरी विकावी लागली. वेस्ट इंडिज विरुद्ध डेब्यु टेस्टमध्ये शतक झळकवल्यानंतर यशस्वीने भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 4.30 वाजता आपल्या वडिलांना फोन केला. यशस्वीचे वडिल भूपेंद्र जैस्वाल यांचं भदोही येथे छोट्स पेंटच दुकान आहे.

‘तुम्ही खूश आहात ना पप्पा?’

“शतक झळकवल्यानंतर यशस्वीने पहाटे 4.30 वाजता फोन केला. त्याला आपल्या अश्रूंचा बांध रोखता आला नाही. माझेही डोळे पाणावले. हा खूप भावनिक क्षण होता. तो माझ्याशी जास्तवेळ बोलू शकला नाही. तो थकलेला. त्याने मला फक्त इतकं विचारल की, ‘तुम्ही खूश आहात ना पप्पा?'” भूपेंद्र जैस्वाल यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना हे सांगितलं.

यशस्वीच्या नावावर हे मोठे रेकॉर्ड

21 वर्ष 196 दिवसांच्या वयात यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी डेब्यु केला. टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यु सामन्यात 150 धावा बनवणारा पाचवा सर्वात कमी वयाचा फलंदाज आहे. परदेशात कसोटी सामन्यात डेब्युमध्ये शतक झळकवणारा यशस्वी सातवा भारतीय फलंदाज आहे. त्याने मोहम्मद अझरुद्दीनचा रेकॉर्ड मोडला. टेस्ट डेब्युमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा भारतीय फलंदाज बनलाय. परदेशात डेब्यु करताना शतक झळकवणारा पहिला भारतीय ओपनर आहे.

यशस्वीच पाकिस्तान विरुद्ध शतक

IPL 2023 मध्ये चांगल्या कामगिरीनंतर यशस्वीला टीम इंडियात स्थान मिळालय. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी त्याचा कमालीचा रेकॉर्ड आहे. 2020 अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. पण यशस्वीला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळाला होता. तो टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पाकिस्तान विरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये त्याने नाबाद शतक झळकावलं होतं.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.