AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni चा कोट्यवधी कमवण्याचा प्लान, थालापथी विजयला घेऊन चित्रपट बनवणार, स्वत:ही करणार अभिनय

MS Dhoni प्रोड्यूसर बनण्याची तयारी करतोय. दक्षिणेचा सुपरस्टार थालपथी विजयला घेऊन तो चित्रपट बनवणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करतोय.

MS Dhoni चा कोट्यवधी कमवण्याचा प्लान, थालापथी विजयला घेऊन चित्रपट बनवणार, स्वत:ही करणार अभिनय
dhoni-vijay
| Updated on: Jun 22, 2022 | 2:54 PM
Share

मुंबई: MS Dhoni प्रोड्यूसर बनण्याची तयारी करतोय. दक्षिणेचा सुपरस्टार थालपथी विजयला घेऊन तो चित्रपट बनवणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करतोय. कॉलीवुड मध्ये तो प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार धोनी या चित्रपटात रोलही करु शकतो. धोनीने स्वत: साऊथ सुपरस्टारला फोन करुन हा चित्रपट करण्याची विनंती केली आहे. थालापथी विजयने (Thalapathy vijay) सुद्धा ही ऑफर स्वीकारल्याची माहिती आहे. धोनी स्वत:चा प्रोडक्शन हाऊस (Production house) सुरु करण्याच्या विचारात आहे. त्याच्याच प्रोडक्शन हाऊसकडून विजयच्या आणखी काही चित्रपटांची निर्मिती होऊ शकते. याआधी एमएस धोनीच्या आयुष्यावर ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ म्हणून सिनेमा आला होता. सुशात सिंह राजपूतने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. दीशा पटानीने या चित्रपटातून डेब्यु केला होता. धोनीने स्वत: या चित्रपटाची निर्मिती केली नव्हती. त्याचा जवळचा मित्र आणि बिझनेस पार्टनर अरुण पांडेने हा चित्रपट बनवला होता.

नयनतारा बरोबरही चित्रपट?

याआधी महेंद्रसिंह धोनी लवकरच एका तामिळ चित्रपटाची निर्मिती करणार असं वृत्त होतं. क्रिकेट आणि चेन्नई सुपर किंग्समुळे एमएस धोनीची तामिळनाडूत मोठी लोकप्रियता आहे. याच लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. धोनीने दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा बरोबर हातमिळवणी केलीय. धोनीच्या चित्रपटात नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसू शकते. स्पोर्ट्स टायगरने हे वृत्त दिलं होतं. चेन्नईला चार वेळा आय़पीएलचे विजेतेपद मिळवून देणारा धोनी आता कॉलीवूडमध्ये नशीब आजमवतोय.

हरजभज सिंगने सुद्धा ‘डिक्कीलूना’ मध्ये काम केलं

मे महिन्याच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार होतं. तामिळ चित्रपटांमध्ये नशीब आजमवणार धोनी पहिला क्रिकेटपटू नाहीय. धोनीच्या आधी हरजभज सिंगने सुद्धा ‘डिक्कीलूना’ मध्ये काम केलं होतं. क्रिकेट करीयर संपल्यानंतर भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी दुसरी इनिंग म्हणून चित्रपटात काम करुन पाहिलय. पण कोणीच स्वत:ला स्थापित करु शकल नाही.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.