IPL 2021: लीग सामन्यानंतरही हर्षल पटेल पर्पल कॅपचा धनी, प्लेऑफमध्ये चित्र बदलणार का?

यंदाच्या आयपीएलच्या पर्वात रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाचा गोलंदाज हर्षल पटेलने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने सुरुवातीपासून पर्पल कॅप स्वत:कडे ठेवली केली आहे.

IPL 2021: लीग सामन्यानंतरही हर्षल पटेल पर्पल कॅपचा धनी, प्लेऑफमध्ये चित्र बदलणार का?
पर्पल कॅप (आयपीएल)

IPL 2021: यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2021) लीग सामने आता संपले असून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. प्लेऑफमध्ये चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ पोहोचले आहेत. तब्बल 56 सामन्यानंतर आता ऑरेंज कॅपसह पर्पल कॅपचे चित्रही स्पष्ट होत आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणीर पर्पल कॅप जरी सतत बदलत असली तरी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला मिळणारी पर्पल कॅप मात्र सुरुवातीपासून आरसीबीच्या हर्षल पटेलकडेच (Harshal Patel) आहे.

नुकत्याच झालेल्या आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) सामन्यात हर्षलने केवळ 1 विकेट घेतली. मात्र याआधीच त्याने एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय असणाऱ्या बुमराहचा 27 विकेट्सचा रेकॉर्ड तोडला असून आता त्याच्या खात्यात 14 सामन्यात 30 विकेट्स झाल्या आहेत. यंदा त्याने यावेळी त्याने हॅट्रिकही घेतली असून 27 धावा देत 5 विकेट्स घेणं हे त्याचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.

आवेश खान केवळ टक्कर देण्यास सज्ज

हर्षलच्या या दमदार कामगिरीच्या आसपास कोणताच गोलंदाज नसून पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या दिल्लीच्या आवेश खानच्या नावावर 22 विकेट्सच आहेत. दोघांमध्ये अजून तब्बल 8 विकेट्सचा फरक आहे. त्यात स्पर्धेचे फारच कमी सामने राहिले असल्याने आवेशसाठी ही कामगिरी फार अवघड आहे. तर इतर स्थानावरील गोलंदाजाचे संघ स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. थेट सातव्या स्थानावरील शार्दूलचा संघ चेन्नई स्पर्धेत असून त्याच्या नावावरही केवळ 18 विकेट्सच आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप-5 गोलंदाज

1. हर्षल पटेल (आरसीबी) –  14 सामने 30 विकेट
2. आवेश खान (दिल्ली कॅपिटल्स)- 14 सामने 22 विकेट
3. जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)- 14 सामने 21 विकेट
4.मोहम्मद शमी (पंजाब किंग्स) – 14 सामने 19 विकेट
5. राशिद खान (सनरायजर्स हैद्राबाद)-  14 सामने 18 विकेट

पर्पल कॅपची संपूर्ण यादी पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा :

IPL 2021 च्या लीग सामन्यांनंतर ऑरेंज कॅप केएल राहुलकडे, अशी आहे संपूर्ण यादी

#MIvsSRH : सामना जिंकला, पण रनरेटच्या लढाईत मुंबईचा पराभव, प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही, KKR चाहत्यांकडून मजेशीर मीम्स व्हायरल

IPL 2021: आरसीबीचा चित्तथरारक विजय, भरत-मॅक्सवेल जोडीची तुफान खेळी, दिल्लीवर 7 गडी राखून विजय

(After league round matches in ipl 2021 Puprle cap is still with Harshal Patel know full list)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI