आकाश चोप्रा म्हणतो ‘हा’ भारतीय खेळाडू परग्रहावरचा, 2021 हाच गाजवणार

आकाश चोप्रा म्हणतो 'हा' भारतीय खेळाडू परग्रहावरचा, 2021 हाच गाजवणार
समालोचक आकाश चोप्रा

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने युवा खेळाडूंच्या धमाकेदार खेळीच्यो जोरावर दमदार विजय मिळवला. ज्यानंतर भारतीय क्रिकेटर्सवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 19, 2021 | 7:09 PM

मुंबई : श्रीलंका संघाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन करत 7 विकेट्सने अप्रतिम विजय मिळवला. गोलंदाजानी दिलासादायक गोलंदाजी केली पण तरीही भारताला विजयासाठी 263 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विजयाची मूहूर्तमेढ अवघ्या 24 चेंडूत 43 धावा ठोकत सलामीवीराची योग्य भूमिका निभावली पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने… पृथ्वीने अर्धशतक केले नसले तरी त्याच्या तुफान खेळीमुळेच भारताला विजय मिळवणे सोपे झाले. त्याच्या या खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचनेही गौैरवण्यात आलं. त्याच्या कौतुकात भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने ‘तो या ग्रहाचा नसून परग्रहाचा खेळाडू आहे’ असं मजेशीर वक्तव्य केलं आहे.

शॉ ने याआधी शेवटचा वनडे सामना फेब्रुवारी 2020 मध्ये खेळला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब खेळीमुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आलं होतं. पण त्यानंतर शॉने विजय हजारे ट्रॉफीमध्ये तब्बल 800 धावा ठोकल्या. आयपीएल 14 च्या आतापर्यंत झालेल्या सामन्यातही त्याने तुफान फलंदाजी केली त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात त्याला संघात स्थान दिलं गेलं. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्य असल्याचं शॉने पहिल्याच सामन्यात सिद्ध केलं. याच खेळीबद्दल आकाश त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “लक्ष्य पाहता श्रीलंका संघ भारतावर थोडा वरचढ ठरेल असं वाटत होतं. पण शॉने मैदानात येताच जलवा दाखवला आणि स्वत:चं राज्य प्रस्थापित केलं. तो एका वेगळ्याच ग्रहाचा अप्रतिम खेळाडू असल्यासारखं वाटतं. मी शॉचा मोठा फॅन आहे.”

शॉला पाहून आली सेहवागची आठवण

शॉ ची फलंदाजी पाहून आकाशला त्याचा साथीदार आणि माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागची आठवण आली. तो म्हणाला, “शॉला खेळताना पाहून सेहवागची आठवण आली. शॉने 24 चेंडूत 43 रन केले. यावेळी त्याने कोणतीच अधिक मेहनत न घेता एकदम सुंदर असे गॅपमध्ये शॉट्स खेचत रन्स केले. त्याचा असा फॉर्म पाहता हे 2021 वर्ष त्याच्याच नावावर असेल असं वाटतं आहे.”

हे ही वाचा :

IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध विजयासह शिखरने गाठले रेकॉर्ड्सचे ‘शिखर’, एकाच सामन्यात अनेक विक्रम

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

(After Prithvi Shaws Awsome Knock Against Sri Lanka Akash Chopra says he is From Different Planet)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें