Asia cup 2022: राहुल द्रविड नसतील, तर लक्ष्मण यांच्यापेक्षा MS Dhoni जास्त चांगला पर्याय
Asia cup 2022: आशिया कप स्पर्धेत त्यांच्या सहभागी होण्याबद्दल साशंकता आहे. आता द्रविड जाणार नसतील, तर प्रश्न हा आहे की, एमएस धोनी (MS Dhoni) टीम इंडियाची साथ देणार?

मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेआधी टीम इंडियाला झटका बसला आहे. भारताचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आशिया कप स्पर्धेत त्यांच्या सहभागी होण्याबद्दल साशंकता आहे. आता द्रविड जाणार नसतील, तर प्रश्न हा आहे की, एमएस धोनी (MS Dhoni) टीम इंडियाची साथ देणार? तो पुन्हा एकदा मेंटॉर, मार्गदर्शकाच्या रोल मध्ये दिसणार? कारण वेळ आणि परिस्थिती दोन्ही धोनी मेंटॉर बनू शकतो, याकडे इशारा करतायत. सध्यातरी या बद्दल कुठलीही अधिकृत माहिती नाहीय. राहुल द्रविड संघासोबत जाणार नसतील, तर त्या परिस्थितीत दुसऱ्याकोणाला तरी ही जबाबदारी निभवावी लागेल. त्यासाठी एमएस धोनीचं नाव समोर येतय.
टीम इंडियाचा सध्याचा ट्रेंड काय आहे?
टीम इंडियाच्या सध्याच्या ट्रेंडनुसार, राहुल द्रविड ज्या दौऱ्यावर संघासोबत नसतात, तिथे व्हीव्हीएस लक्ष्मण कोचिंगची जबाबदारी संभाळतात. नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात लक्ष्मण कोच होते. आशिया कप मध्येही हेच चित्र दिसू शकतं. द्रविड नसतील, तर तिथे लक्ष्मण कोचच्या भूमिकेत दिसू शकतात.
धोनी असण्याचे फायदे काय?
आशिया कप द्विपक्षीय नाही, तर मल्टीनॅशनल स्पर्धा आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट पुन्हा एकदा एमएस धोनीच्या नावाचा विचार करु शकते. हा निर्णय घेतल्यास, त्यामागे अनेक कारणं असू शकतात. एकतर व्हीव्हीएस लक्ष्मण यांच काम सोपं होईल. दुसरीकडे धोनी बरोबर खेळाडूंच जे बॉन्डिंग आहे, त्याचा खेळाडूंना फायदा होईल. सध्याच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी धोनीच्या नेतृत्वाखाली डेब्यु केलाय.
धोनी याआधी कधी मेंटॉर होता?
धोनीला मेंटॉर बनवताना त्याच्याकडे आशिया कप स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे, ही बाब सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. धोनी पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांविरुद्ध खेळला आहे. त्याला क्रिकेटची चांगली समज आहे, ज्याचा टीमला फायदा होईल. धोनी मागच्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये संघाचा मेंटॉर होता. पण त्या स्पर्धेत भारताला विशेष चमक दाखवता आली नाही.
