AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: ‘जिंकण किंवा हरणं तुमच्या हातात नाहीय पण…’ विराट कोहलीने सोडलं मौन

लीडर बनण्यासाठी तुम्हाला कॅप्टन बनण्याची आवश्यकता नाही. एमएस धोनी संघात होता, तेव्हा असं नव्हत की, तो लीडर नव्हता.

Virat Kohli: 'जिंकण किंवा हरणं तुमच्या हातात नाहीय पण...' विराट कोहलीने सोडलं मौन
ALL PHOTOS AFP
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 7:19 PM
Share

मुंबई: “पुढे जाण्यासाठी कुठली वेळ योग्य आहे, हे समजणं सुद्धा नेतृत्वाचाच एक भाग आहे. मी नेहमीच कर्णधारासारखा विचार केलाय” असं विराट कोहली (Virat Kohli) एका कार्यक्रमात म्हणाला. कसोटी संघाचं (Test Team) कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने प्रथमच लीडरशीपच्या विषयावर भाष्य केलं आहे. सात वर्षानंतर विराटने भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं. 2014 मध्ये एमएस धोनीकडून विराटकडे कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी आली होती. विराटच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या 68 पैकी 40 कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला. भारताचा आतापर्यंतचा तो सर्वात यशस्वी कॅप्टन (successful captain) आहे. “एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. पहिलं म्हणजे काय मिळवायचय ते तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे. तुम्ही त्या लक्ष्यापर्यंत पोहोचाल किंवा नाही पोहचणार. प्रत्येक गोष्टीला एक कार्यकाळ असतो. मुदत असते. त्याची तुम्हाला कल्पना असली पाहिजे. एक फलंदाज म्हणून तुम्ही संघाला जास्त योगदान देऊ शकता” असं कोहली एका कार्यक्रमात म्हणाला.

लीडर बनण्यासाठी तुम्हाला… “लीडर बनण्यासाठी तुम्हाला कॅप्टन बनण्याची आवश्यकता नाही. एमएस धोनी संघात होता, तेव्हा असं नव्हत की, तो लीडर नव्हता. कर्णधारपद सोडल्यानंतरही आम्हाला धोनीचा सल्ला लागायचा” “जिंकण किंवा हरणं तुमच्या हातात नाहीय पण प्रत्येक दिवस सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही करु शकता” असे विराट म्हणाला.

हा सुद्धा नेतृत्वाचाच एक भाग “पुढे जाणं, त्यासाठी योग्य वेळ निवडणं हा सुद्धा नेतृत्वाचाच एक भाग आहे. तुम्ही वेगळ्या रोलमध्ये राहून संघाला तितकचं योगदान देऊ शकता” असं विराटने सांगितलं. “मी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलो, नंतर कर्णधार झालो. मी संघात एक खेळाडू होतो तेव्हा सुद्धा कर्णधारासारखाचा विचार करायचो. संघ जिंकला पाहिजे, एवढीच माझी भावना होती” असे विराट म्हणालाा.

विराटने टी-20 वर्ल्डकपनंतर टी-20 संघाची कॅप्टनशिप सोडली. त्याने आधीच तशी घोषणा केली होती. पण विराटला वनडेच्या कर्णधारपदावर कायम रहायचे होते. पण बीसीसीआयला मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नको होते. त्यामुळे त्याला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं.

After resign from team india test captaincy virat kohli First time break his silence

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.