AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तालिबानच्या अफगाणिस्तानवरील ताब्यामुळे पाकिस्तान क्रिकेटवर संकट, PCB च्या अडचणीत वाढ

संपूर्ण जगात सध्या तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थितीबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान या वादाचा परिणाम पाकिस्तान क्रिकेटवरही होताना दिसत आहे.

तालिबानच्या अफगाणिस्तानवरील ताब्यामुळे पाकिस्तान क्रिकेटवर संकट, PCB च्या अडचणीत वाढ
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB)
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 6:33 PM
Share

कराची : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष अफगाणिस्तानकडे लागले असताना या सर्वाचा परिणाम अफगाणिस्तानचं शेजारी राष्ट्र पाकिस्तानवरही झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) बोर्ड या सर्वामुळे अडचणीत आला असून आगामी काळातील न्यूझीलंड आणि इंग्लंड या महत्त्वाच्या संघाच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे न्यूझीलंडच्या काही क्रिकेटपटूंनी पाकिस्तान दौऱ्यावर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत जाण्यास नकार दर्शवला आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष एहसान मनी (Ehsan Mani) यांनी न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी नक्कीच येणार असल्याचे सांगितले आहे.

एहसान मनी यांनी शुक्रवारी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत कराचीमधून सांगितले, ”पाकिस्तानमध्ये सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडचा संघ तर ऑक्टोबरमध्ये इंग्लंडचा संघ दौरा करणार आहे. पाकिस्तान या दोन्ही दौऱ्यांबाबत सर्व तयारी करणार असून यावेळी कोणतीही समस्या उपस्थित होणार नाही.”

न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा

न्यूझीलंडचा संघ 11 सप्टेंबर रोजी पाकिस्तानला पोहोचणार आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. रावळपिंडी आणि लाहौरच्या मैदानात 3 ऑक्टोबरपर्यंत हे सर्व सामने खेळवण्यात येतील. या दौऱ्यातील सामन्यामुळे न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघाना आगामी टी-20 वर्ल्ड कपचा सराव होणार आहे. मागील 19 वर्षांत पहिल्यांदाच न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे.

न्यूझीलंडनंतर इंग्लंड येणार पाकिस्तानच्या दौऱ्यावर

न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये इंग्लंडची क्रिकेट टीम दाखल होईल.  इंग्लंडचा पुरुष आणि महिला असे  दोन्ही संघ यावेळी दौैऱ्यावर असतील. यावेळी पुरुष संघ 2 टी-20 मालिका खेळेल. 2005 नंतर इंग्लंडचा हा प्रथमच पाकिस्तान दौरा असेल.

हेही वाचा :

Afghanistan Crisis : अंगावरच्या कपड्यासह बाहेर पडलोय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता, पैशांचं तर सोडाच : अशरफ गनी

पाकिस्तानी फलंदाजाने सलामी कसोटीच्या दोन्ही डावात ठोकलं शतक, भारताविरुद्ध मात्र अपयश, थेट संघातूनच बाहेर

(After talibanis captured afghanistan new zealand and england cricket team hesitate to go on pakistan tour)

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.