AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी फलंदाजाने सलामी कसोटीच्या दोन्ही डावात ठोकलं शतक, भारताविरुद्ध मात्र अपयश, थेट संघातूनच बाहेर

पाकिस्‍तान क्रिकेट संघाच्या या खेळाडूने आपल्या पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. त्यामुळे पुढे जाऊन तो एक मोठा खेळाडू होईल असे साऱ्यानांच वाटले. पण झाले काही वेगळेच...

पाकिस्तानी फलंदाजाने सलामी कसोटीच्या दोन्ही डावात ठोकलं शतक, भारताविरुद्ध मात्र अपयश, थेट संघातूनच बाहेर
यासिर हमीद
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 11:39 AM
Share

कराची : आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट आणि स्थानिक क्रिकेटमध्ये फार फरक असतो. अनेकदा स्थानिक क्रिकेटमध्ये अप्रतिम प्रदर्शन करणारे क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय दर्जावर मात्र काहीच खास कामगिरी करत नाही. पण असे असतानाही स्थानिक क्रिकेट गाजवलेल्या प्रत्येक खेळाडूला आंतररारष्‍ट्रीय डेब्‍यू यादगार बनवायचा असतो. अशामध्ये एखादा फलंदाज सलामीच्या सामन्यात दोन्ही डावात शतक ठोकेल तर क्या बात! तर अशीच अप्रतिम कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पाकिस्तानचा माजी फलंदाज यासिर हमीदने (Yasir Hameed) सलामीच्या कसोटी सामन्यातच (Debut Test) दोन्ही डावात एक एक शतक ठोकत धडाकेबाज प्रदर्शनाने कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण पुढे जाऊन भारतीय संघाच्या दौऱ्यात मात्र यासिरची कामगिरी इतकी खराब होती की त्याला संघातूनच बाहेर पडावे लागले. तर आज या सर्वाबद्दल सांगण्याचे कारण म्हणजे यासिरने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात आजच्याच दिवशी म्हणजे 21 ऑगस्ट रोजी झालेल्या कसोटी सामन्यात केली होती.

असा झाला होता सामना

यासिर हमीदने 2003 साली बांग्‍लादेश विरुद्ध कराची येथे पाकिस्तान संघात पदार्पण केले.  20 ते 24 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्या दिवशी बांग्‍लादेशने 288 धावा केल्या. ज्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑगस्‍ट रोजी पाकिस्तान संघाने पहिला डाव 346 धावांवर संपवला ज्यामध्ये यासिरने 253 चेंडूत 170 धावांची तुफान खेळी केली. त्यानंतर बांग्‍लादेशने दुसऱ्या डावात 274 धावा करत पाकिस्तानला विजयासाठी 217 धावांचे लक्ष्‍य दिले. जे पाकिस्‍तानने 70 ओव्हरमध्ये केवळ तीन विकेट गमावर पूर्ण केले. या डावात देखील यासिरने 105 धावा करत शतक ठोकले. हमीदला या कामिगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

पाकिस्‍तानचा 2007 मधील भारत दौरा

यासिर हमीद पाकिस्‍तान संघाकडून 25 कसोटी आणि 56 एकदिवसीय सामने खेळला. पण या सर्वांमध्ये पाकिस्‍तान संघाने 2007 साली केलेल्या भारताच्या दौऱ्यामध्ये मात्र यासिरला फार खराब कामगिरीचा सामना करावा लागला. पाकिस्‍तानने पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-3 ने गमावली. तर तीन कसोटी सामन्यांची मालिका 0-1 ने गमावली. या सर्वामध्ये यासिर हमीदने अत्यंत खराब प्रदर्शन केले. ज्यामुळे या दौऱ्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हमीदने 25  कसोटी सामन्यात 32.41 च्या सरासरीने 2 शतकांसह 1 हजार 491 धावा केल्या. तर 54 वनडे सामन्यात 36.87  च्या सरासरीने तीन शतकं ठोकत 2 हजार 28 धावा केल्या.

इतर बातम्या

इंग्लंडच्या मैदानात ‘या’ गोलंदाजाची अफलातून कमाल, सात हॅट्रीक घेत रचला इतिहास

तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद

VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’

(Pakistani Batsman yasir hameed double century debut against bangladesh on this day marathi)

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.