इंग्लंडच्या मैदानात ‘या’ गोलंदाजाची अफलातून कमाल, सात हॅट्रीक घेत रचला इतिहास

क्रिकेटचा जन्म झालेल्या इंग्‍लंडमध्येच आपल्या गोलंदाजीने अतुलनीय कामगिरी करणाऱ्या या गोलंदाजाने एका पाठोपाठ एक नवे विक्रम रचले आहेत.

इंग्लंडच्या मैदानात 'या' गोलंदाजाची अफलातून कमाल, सात हॅट्रीक घेत रचला इतिहास
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 10:52 AM

लंडन : भारत आणि इंग्‍लंड (India vs England) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. तर सांगायचा विषय असा की इंग्लंडमध्ये असलेले कसोटी सामने हे अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण क्रिकेटचा जन्म जिथे झाला तो देश इंग्लंड असल्याने तिथे मिळवलेला विजय, तेथील कामगिरी कायमच वेगळी आणि विशेष असते. अशामध्ये एका क्रिकेटपटूने इंग्लंडच्या संघातून खेळताना आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो केलं होतं. या खेळाडूचा नाव डग राइट (Doug Wright) असं असून त्याचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 21 ऑगस्ट, 1914 रोजी इंग्लंडमध्ये झाला होता.

डग एक स्मरणात राहिलेला क्रिकेटपटू यासाठी आहे कारण त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी करत तब्बल सात हॅट्रिक घेतल्या होत्या. पण त्याचसोबत त्याने काही सामन्यांत अगदीच सुमार गोलंदाजी देखील केली आहे. याचा अंदाज त्याच्या अॅशेज सिरीजमधील सामन्यांतून येतो. कारण सिरीजमध्ये 14 सामने खेळलेल्या डगचा संघ केवळ एकदाच विजयी झाला होता. तर सिडनी येथे ऑस्‍ट्रेलिया विरोधातच त्याने 1946-47 मध्ये एका डावात 105 धावा देत 7 अप्रतिम विकेट्स पटकावल्या होत्या.

497 सामने आणि 2 हजार 56 विकेट्स

डग राइटने इंग्‍लंड संघाकडून एकूण 34 कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये 11.11 च्या सरासरीने 289 धावा केल्या. पण त्याच मुख्य काम गोलंदाजी असल्याने त्याने 34 सामन्यात 108 विकेट्स खिशात घातल्या होत्या. यामध्ये त्याचे ऑस्ट़्रलियाविरुद्ध 105 धावा देत सात विकेट्स पटकावणं हे सर्वोत्तम प्रदर्शन होतं. तर एका सामन्यात 175 धावांच्या बदल्यात 10 विकेटही पटकावल्या आहेत. डग याने कसोटी क्रिकेटमध्ये 6 वेळाहून अधिकदा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटचा विचार करता डगने 497 सामन्यात 12.34 च्या सरासरीने 5 हजार 903 धाव करत 16 अर्धशतकही केली आहेत. तर तब्बल 2 हजार 56 फलंजदाजाना तंबूत धाडलं आहे.

इतर बातम्या

तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद

Video: उडे जब जब झुल्फें तेरी, पोरींचा घोळका झूम मिटींगवरच नीरज चोप्रासमोर नाचायला लागला

VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’

(England cricketer leg spinner doug wright birthday on this day marathi)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.