AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Final | वर्ल्ड कपमधला पराभव इतका मनाला लागला की, त्यांनी थेट दुकानात घुसून….

IND vs AUS Final | टीम इंडियाचा कुठलाही पराभव पचवणं चाहत्यांसाठी खूप कठीण असतं. त्यात ती वर्ल्ड कपची फायनल असेल, तर विचारच करु नका. काही लोक खिलाडूवृत्तीने पराभव स्वीकारतात. काही लोकांना सहजतेने ती गोष्ट घेता येत नाही. काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनल हरल्यानंतर देशाच्या एका भागात अशीच एक अप्रिय घटना घडली.

IND vs AUS Final | वर्ल्ड कपमधला पराभव इतका मनाला लागला की, त्यांनी थेट दुकानात घुसून....
After team india final lost Against Australia in World cup 2023
| Updated on: Nov 20, 2023 | 10:34 AM
Share

IND vs AUS Final | भारतीय क्रिकेट टीम आणि त्यांच्या फॅन्ससाठी 19 नोव्हेंबर हा खूपच निराशाजनक दिवस ठरला. सलग 10 सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने 6 विकेटने टीम इंडियावर विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. हा सामना संपल्यानंतर अनेक भारतीयांच मन मोडलं. अनेकांनी मोठ्या मनाने टीम इंडियाचा पराभव स्वीकारला. टीम इंडियाची वर्ल्ड कपमधली कामगिरी लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केलेत. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा, हीच प्रत्येक क्रिकेट चाहत्याची इच्छा होती. टीम इंडियाच या वर्ल्ड कपमधल प्रदर्शनच तसं होतं. त्यामुळे टीम इंडियालाच वर्ल्ड कप विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. दुर्देवाने अखेरच्या सामन्यात काही चूका झाल्या. त्यामुळे टीम इंडियाला झळाळत चषक उंचावण्याची संधी मिळाली नाही.

भारतात क्रिकेटला धर्माच स्थान आहे. त्यामुळे इथे पराभव पचवण खूप कठीण गोष्ट असते. टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधला परफॉर्मन्स पाहून अनके चाहते आपल्या टीमच्या पाठिशी उभे राहिलेत. पण त्याचवेळी काही चाहत्यांना हा पराभव पचवण खूप कठीण गेलं. त्यांना टीम इंडियाचा पराभवच सहन झाला नाही. उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये काही युवकांनी रागाच्या भराच दुकानातून टीव्ही उचलून बाहेर आणले व फोडले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. भारतीय टीमने आमच मन मोडलं असं या युवकांच म्हणणं होतं. पराभवानंतर अशा प्रकारे टीव्ही फोडण्याच्या घटना शेजारच्या पाकिस्तानात घडतात. पण यावेळी भारतात असं घडलं.

हे युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही युवक टीव्हीच्या दुकानात मॅच पाहत उभे असलेले दिसतात. ऑस्ट्रेलियाने जसा सामना जिंकला, दोन युवकांनी दुकानात ठेवलेले टीव्ही उचलून बाहेर आणले व फोडले. असं करु नका, असं दुकानदार त्यांना सांगत होता. पण हे युवक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांच लक्ष्य दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने आरामात 42 चेंडू आणि 6 विकेट राखून हे लक्ष्य पार केलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.