Virat kohli Fifty IPL 2022: नवऱ्याच्या हाफ सेंच्युरीनंतर अनुष्का शर्माही फुलफॉर्मध्ये, मैदानावर अशी दिली साथ

Virat kohli Fifty IPL 2022: विराटचा आजचा सामना पहायला त्याची पत्नी अनुष्का शर्मा प्रेक्षक स्टँडमध्ये हजर आहे. विराटने आज अर्धशतक झळकावल्यानंतर अनुष्का आपल्या जागेवरुन उठून उभी राहिली.

Virat kohli Fifty IPL 2022: नवऱ्याच्या हाफ सेंच्युरीनंतर अनुष्का शर्माही फुलफॉर्मध्ये, मैदानावर अशी दिली साथ
virat kohli-Anushka sharma Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 5:26 PM

मुंबई: IPL मध्ये क्रिकेटपटूंबरोबर त्यांच्या बायका, गर्लफ्रेंडचीही चर्चा होते. त्यांच्या प्रत्येक Reaction वर स्टेडियममधल्या कॅमेऱ्याची बारीक नजर असते. आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना सुरु आहे. या मॅचला गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याची (Hardik pandya) बायको आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दोघी उपस्थित आहेत. दोघींच्या स्टेडियममधील अदांवर सोशल मीडियालही लक्ष ठेवून असतो. आज विराटने कोहलीने (Virat kohli) हाफ सेंच्युरी झळकावली. बऱ्याच प्रतिक्षेनंतर विराटच्या बॅटमधून आज धावा निघाल्या. त्यामुळे आजची खेळी फक्त विराटसाठीच नाही, तर त्याची पत्नी, चाहते यांच्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आज विराटने तब्बल 14 सामन्यानंतर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावलं. यंदाच्या 15 व्या सीजनमध्ये अर्धशतकाआधी विराटचा सर्वाधिक स्कोर 48 धावा होता. RCB च्या 10 व्या मॅचमध्ये विराटने हे अर्धशतक झळकावलं. आयपीएलच्या पीचवर विराटचं हे 43 व अर्धशतक आहे. आयपीएलमध्ये विराटच्या नावावर पाच शतक सुद्धा आहेत.

खास स्टाइलमध्ये नवऱ्याला चिअरअप

विराटचा आजचा सामना पहायला त्याची पत्नी अनुष्का शर्मा प्रेक्षक स्टँडमध्ये हजर आहे. विराटने आज अर्धशतक झळकावल्यानंतर अनुष्का आपल्या जागेवरुन उठून उभी राहिली. टाळ्या वाजवतानाच तिने आपल्या खास स्टाइलमध्ये नवऱ्याला चिअरअप केलं. अनुष्काची ही Reaction आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विराटच्या फिफ्टीनंतर अनुष्का शर्मा खूपच आनंदात दिसली. याआधी सुद्धा अनुष्काच्या स्टेडियममधल्या अदा चर्चेच्या विषय ठरल्या आहेत.

आपल्या बॅटने उत्तर दिलं

मागच्या काही सामन्यांपासून सातत्याने अपयशाचा सामना करणाऱ्या विराट कोहलीने आज अखेर आपल्या बॅटने उत्तर दिलं. बऱ्याच महिन्यांपासून शांत असलेली विराटची बॅट आज तळपली. विराटच्या फॉर्मबद्दल सातत्याने शंका उपस्थित केली जात होती. आयपीएल सुरु झाल्यापासून, तर विराटच्या बॅटमधून धावा जणू आटल्या होत्या. विराट फॉर्मसाठी चाचपडत होता. विराटचा फॉर्म टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी चिंतेचा विषय ठरला होता. कारण आगामी टी 20 वर्ल्ड कप लक्षात घेता, विराटने फॉर्ममध्ये परतणं आवश्यक होतं. विराट कोहलीने आज 53 चेंडूत 58 धावा केल्या. यात सहा चौकार आणि एक षटकार होता.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.