Virat Kohli | विराट कोहलीची कृती BCCI ला अजिबात नाही आवडली, आता सर्व प्लेयर्सना सुनवलं फरमान
Virat Kohli | विराट कोहलीने सोशल मीडियावर असं काय केलं?. अन्य खेळाडूंनी पुन्हा अशी कृती करु नये, म्हणून बीसीसीआयने आताच पावल उचलली आहेत. भारतीय टीम मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलय.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा अव्वल खेळाडू विराट कोहलीची सोशल मीडियावरील एक कृती बीसीसीआयला अजिबात आवडलेली नाही. आशिया कप स्पर्धेच्याआधी तयारीसाठी बंगळुरुमध्ये ट्रेनिंग कॅम्प लावण्यात आला आहे. यात विराट कोहली, रोहित शर्मा सर्वच प्लेयर्स आहेत. या कॅम्पच्या पहिल्याच दिवशी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टवर बीसीसीआय नाराज असल्यच समजतय. अन्य खेळाडूंनी पुन्हा अशी कृती करु नये, म्हणून बीसीसीआयने आताच पावल उचलली आहेत. सोशल मीडियावर कुठल्याही खेळाडूने आपल्या फिटनेस स्कोरबद्दल माहिती देऊ नये, असं भारतीय टीम मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलय.
विराट कोहलीने पोस्ट केल्यानंतर काहीतासातच बीसीसीआयकडून हे सांगण्यात आलं. त्यामुळे बीसीसीआयला विराट कोहलीची कृती पसंत नसल्याच दिसतय. कॅम्पच्या पहिल्यादिवशी विराटने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. यो यो टेस्टमध्ये 17.2 स्कोर, अशी माहिती विराटने पोस्टमध्ये दिली होती.
बीसीसीआयने काय सांगितलं?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना बोर्डाचा दुष्टीकोन सांगण्यात आला आहे. सोशल मीडियावर कुठलीही गोपनीय माहिती शेअर करु नये. खेळाडूंना ही तोंडी माहिती देण्यात आली आहे, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. ते रनिंगची पोस्ट करु शकतात, पण स्कोरची पोस्ट करणं हे कॉन्ट्रॅक्ट नियमांच उल्लंघन आहे.
त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते
भारतीय टीम मॅनेजमेंटने 6 दिवसांसाठी हा कॅम्प लावला आहे. पहिल्या दिवशी खेळाडूंची यो-यो टेस्ट करण्यात आली. आशिया कपआधी खेळाडूंची पुरी बॉडी टेस्ट होईल. ज्यांना 13 दिवसांचा फिटनेस प्रोग्रॅम दिला होता, त्यात ब्लड टेस्टही आहे. ट्रेनर्स खेळाडूंच्या फिटनेसची तपासणी करतील. जे खेळाडू फिटनेसच्या निकषात बसणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. बोर्डाला वर्ल्ड कप स्पर्धेमुळे कुठलाही धोका पत्करायचा नाहीय. कुठल्या खेळाडूंना फिटनेस प्रोग्रॅम दिला होता?
वेस्ट इंडिज दौऱ्यावरुन परतलेल्या खेळाडूंना मॅनेजमेंटने 13 दिवसांचा फिटनेस प्रोग्रॅम दिला होता. ब्रेक दरम्यान रोहित, कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना फिटनेस प्रोग्रॅमचे पालन करण्यास सांगण्यात आलं होतं.
