AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS WI: रोव्हमॅन पॉवेलची फटकेबाजी पाहून दुसऱ्याची पर्स रिकामी करणारे किरण कुमार गांधी खूप खूष असतील, कारण…

IND VS WI:

IND VS WI: रोव्हमॅन पॉवेलची फटकेबाजी पाहून दुसऱ्याची पर्स रिकामी करणारे किरण कुमार गांधी खूप खूष असतील, कारण...
| Updated on: Feb 19, 2022 | 12:13 PM
Share

कोलकाता: IPL Mega Auction 2022 च्या वेळी एका चेहऱ्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. ऑक्शन सुरु असताना सोशल मीडियावर काव्या मारन इतकीच त्याची सुद्धा चर्चा झाली. त्यांच नाव आहे. किरण कुमार गांधी. (kiran kumar gandhi) हे किरण कुमार गांधी दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित आहेत. त्यांनी स्वत:चा संघ कमी बजेटमध्ये निवडला. पण अन्य खेळाडूंवर सातत्याने बोली वाढवून दुसऱ्या फ्रेंचायजीची पर्स रिकामी केली. त्यामुळे किरण कुमार गांधींबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. आता किरण कुमार गांधी पुन्हा चर्चेत येण्यामागे कारण आहे, ती कालची रोव्हमॅन पॉवेलची (Rovman powell) तडाखेबंद खेळी. भारताने वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकला असला, तरी रोव्हमॅन पॉवेल कालच्या सामन्यात भाव खाऊन गेला. पॉवेलची मैदानावरची आतषबाजी डोळे दिपवून टाकणारी होती.

भारतीय गोलंदाज अखेरपर्यंत त्याला आऊट करु शकले नाहीत. सहा ऐवजी आठ चेंडूंच षटक असत, तर कदाचित दुसरा निकाल दिसला असता. वेस्ट इंडिजच्या या पॉवर हिटर फलंदाजाने 36 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. यात चार चौकार आणि पाच षटकार होते.

रोव्हमॅन पॉवेल आणि किरण कुमार गांधी यांचं काय कनेक्शन आहे?

तुम्हाला प्रश्न पडला असेल, रोव्हमॅन पॉवेल आणि किरण कुमार गांधी यांचं काय कनेक्शन आहे? ते का खूष होतील? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर त्याच उत्तर असं आहे की, या पॉवेलला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतलय. किरण कुमार गांधी दिल्ली कॅपिटल्सचे मालक आहेत. अवघ्या 2.88 कोटींमध्ये हा पॉवरफुल फलंदाज दिल्लीला मिळाला आहे. किरण कुमार गांधींच नव्हे, तर कालच्या सामन्यात यष्टीरक्षण करणारा ऋषभ पंतही तितकाच आनंदी असेल. कारण आयपीएल 2022 च्या सीजनमध्ये रोव्हमॅन पॉवेल ऋषभच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाकडून खेळणार आहे.

कालच्या भारताच्या विजयात ऋषभ पंतचही महत्त्वाचं योगदान आहे. मॅच जिंकल्यानंतर त्याने भारतीय संघासोबत जल्लोषही केला. पण पॉवेलची फलंदाजी पाहून ऋषभही कुठेतरी मनोमन खूष झाला असेल. रोव्हमॅन पॉवेलची फलंदाजी पाहून मी सुद्धा खूष झालो, हे ऋषभने स्वत: सामन्यानंतर मान्य केलं.

After watching power hitting by rovman powell kiran kumar gandhi will be most happiest man India vs West indies

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.